बायोमेट्रिकच्या सक्तीमुळे रेशन दुकानदारांना कोरोना लस द्यावी

0
5

जळगाव ः प्रतिनिधी

शासनाने लाभार्थ्यांना रेशनचे धान्यासाठी बायोमेट्रिक सक्ती केल्यामुळे कोविड-१९चा संसर्ग होण्याची शक्यता असल्याचे शहरातील तसेच तालुक्यातील १०५ सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदारांना कोरोनाची लस द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अनिल अडकमोल यांनी केली आहे.

शहर व तालुक्यातील १०५ सरकार मान्य स्वस्त धान्य दुकानदार आहेत. प्रत्येक दुकानात पाचशे ते हजार शिधापत्रिकाधारक आहे. कोरोनाच्या वाढता संसर्ग पाहता सरकारने स्वस्त धान्य दुकानदारांना कोविड लसची सुविधा उपलब्ध करून द्यावी. शासनाने धान्य घेण्या साठी लाभार्थींची बायोमेट्रिकची सक्ती केली असल्याने शासनाकडून कोविडच्या अनुषंगाने कोणतेही किट, मास्क, सॅनिटायझर असे साधने पुरवले गेले नाहीत. बहुतेक दुकानदार हे वयोवृद्ध आहे. त्यांना मधुमेह व इतर आजार आहेत. या परिस्थितीमध्ये दुकानदारांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहे. शहरातील कोरोनामुळे आतापर्यंत ४ दुकानदार मृत झाले आहे. त्यामुळे शासनाने सर्व स्वस्त धान्य दुकानदार यांना कोविड लस द्यावी, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेचे अध्यक्ष अडकमोल यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here