बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी नागरिकांना समितीचे आवाहन

0
3

जळगाव, प्रतिनिधी । शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात कोरोनाच्या बनावट आरटीपीसीआर अहवाल प्रकरणी जिल्हाधिकार्‍यांनी चौकशी समिती गठित केली आहे. कोणी नागरिकांना आर्थिक देवाण-घेवाण करून बोगस आरटीपीसीआर अहवाल प्रमाणपत्र मिळाले असेल तर त्यांनी पुराव्यासह गुरुवारी १० फेब्रुवारी रोजी हजर राहावे असे आवाहन या समितीने केले आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात पैसे घेऊन बनावट आरटीपीसीआर अहवाल दिल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी त्रिसदस्यीय चौकशी समिती गठित केली आहे. या समितीमध्ये उप जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक आणि रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक यांचा समावेश आहे.

समितीची चौकशी सुरू झाली असून समितीच्या कामकाजाला सहकार्य म्हणून समितीने नागरिकांना आवाहन केले आहे. आर्थिक देवाण-घेवाण करून बोगस आरटीपीसीआर प्रमाणपत्र कोणाला मिळाले असेल किंवा तसे कोणाला निदर्शनास आले असेल तर त्यांनी स्वतः पुराव्यासह गुरुवार दिनांक १० फेब्रुवारी रोजी कार्यालयीन वेळेमध्ये रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक कार्यालयामध्ये (कक्ष क्र.११३) उपस्थित रहावे असे आवाहन समितीने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here