प्रेम नगरातील शिक्षकाला अज्ञातांनी मारहाण करून मोबाईल केला लंपास

0
5
वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील प्रेम नगरातील शिक्षकाला मारहाण करून त्यांच्याजवळील मोबाईल अज्ञातांनी हिसकावून दुचाकीने फरार झाल्याची घटना ६ सप्टेंबर रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध जिल्हापेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील विवेकानंद नगरात पायी जाणाऱ्या शिक्षकाला मारहाण करून त्यांच्या हातातून १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल अज्ञात तीन जणांनी जबरी हिसकावून दुचाकीने फरार झाले. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत सुर्यभान झाल्टे (वय-३३) रा. प्रेम नगर जळगाव हे शिक्षक आहेत. ६ सप्टेंबर रोजी रात्री १० वाजता ते हरीविठ्ठल नगरमधील विवेकांनद नगरातील विवेकानंद बगीचा येथून शाळेचे सहकारी एम.एस. सुरवाडे यांच्याकडे शाळेच्या कामकाजासाठी आले होते. कामकाज आटोपून घरी ११.३० ते १२ वाजेच्या दरम्यान घरी पायी जात असतांना अज्ञात तीन जण दुचाकीवर त्यांच्या समोर आले. तिघांनी शिक्षक प्रशांत झाल्टे यांना बेदम मारहाण केली आणि त्यांच्याजवळील १० हजार रूपये किंमतीचा मोबाईल जबरी हिसकावून चोरून नेला.

याप्रकरणी शिक्षक प्रशांत झाल्टे यांनी जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात अज्ञात तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक भरत चव्हाण करीत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here