प्रताप विद्या मंदिरात ७३ वा प्रजासत्ताक दिवस उत्साहात संपन्न 

0
2
 चोपडा – (संदिप ओली) येथील चोपडा एज्युकेशन सोसायटी संचलित प्रताप विद्या मंदिरात सकाळी  ७:०० वाजता राष्ट्रीय ध्वजारोहण संपन्न झाले. याप्रसंगी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, संचालक चंद्रहासभाई गुजराथी, किरण गुजराथी, रमेश जैन, शैलेंद्र अग्रवाल तसेच सर्व माजी मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक , निवृत्त शिक्षक व कर्मचारी आदिंची उपस्थिती होती. यावेळी शालेय प्रार्थना “माझाच हिंद देश” हे पंकज नागपुरे आणि त्यांच्या चमूने सादर केले. त्यानंतर तुषार लोहार यांचे स्वरचित “सबसे प्यारा हिंदुस्तान” हे राष्ट्रभक्तीपर गीत शिक्षक व शिक्षिकांच्या समूहाने सादर केले. या गीताचे संगीत संयोजन पी.बी.कोळी व डी.एम.वैद्य यांनी केले.
देशभक्ती व राष्ट्रप्रेमा प्रती शाळा आणि संस्था नेहमी तत्पर असते. तसेच यानंतर समाजप्रबोधनासाठी इ. ९ वी ते १२ वी या वर्गातील विद्यार्थ्यांकरीता “तंबाखू मुक्त शाळा” या अभियाना अंतर्गत रांगोळी स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये हर्षिता साळी, वैष्णवी दिलीप पाटील, चेतना माळी, रोहिणी राठोड, माहेश्वरी धनगर, प्राची निकम, लक्ष्मी सोनवणे ,वैष्णवी चौधरी, रितल पटेल, तृप्ती शाह व वैष्णवी रवींद्र पाटील या विद्यार्थिनींचा सहभाग होता. अतिशय सुबक व उत्कृष्ट रांगोळ्या सर्व विद्यार्थिनींनी रेखाटल्या होत्या. रांगोळीच्या माध्यमातुन नशामुक्ती, व्यसनांचा कट्टर विरोध व  तंबाखू सेवनाने होणारे दुष्परिणाम दर्शविण्यात आलेले होते. उपस्थित मान्यवरांनी सर्व सहभागी विद्यार्थिनींचे कौतुक केले. तसेच त्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या रांगोळी स्पर्धेचे आयोजन शिक्षिका एस.पी.वारडे, जे.आर. बडगुजर तसेच सर्व शिक्षिका यांच्या सहकार्याने करण्यात आले होते. यावेळी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण व तंबाखू मुक्त शाळा अभियान अंतर्गत रांगोळी स्पर्धा उत्साहात संपन्न झाली. यासाठी संस्थेच्या सचिव माधुरी मयूर, संचालक चंद्राहासभाई गुजराथी, मुख्याध्यापक राजेंद्र शिंदे, उपप्राचार्य जे.एस.शेलार, पर्यवेक्षक पी.एस. गुजराथी, एस.एस.पाटील, एस.जी., डोंगरे, पर्यवेक्षिका माधुरी पाटील, संस्था समन्वयक गोविंद गुजराथी, डी. टी.महाजन व शाखांचे प्रमुख पदाधिकारी, शिक्षक बंधू भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी आदिंची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे  सुत्रसंचालन एजाज शेख यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here