जामनेर, प्रतिनिधी । पहूर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बदली करा मागणीसाठी युवा सेने उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील यांनी पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्याकडे मागणी केली होती. अखेर या दोघांमध्ये पहूर पोलिस ठाण्यात बैठक घेऊन सलोखा निर्माण करण्यात आला.
जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे किरकोळ वादातून दोन जणांमध्ये हाणामारी झाली होती या हाणामारी दोन्ही गट पहूर पोलिस ठाण्यामध्ये फिर्याद देण्यासाठी आले असता या ठिकाणी यांच्यासोबत आलेला शेंदुर्णी शहर युवा सेना शहर प्रमुख अजय भोई या युवा सेना कार्यकर्त्याला पहूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांनी गैरवर्तन केलं म्हणून पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची तीन दिवसात बदली करा अन्यथा रस्ता रोको करू असा इशारा युवा सेनेच्या वतीने जळगाव पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रवीण मुंडे यांच्याकडे निवेदनाद्वारे दिला होता दिनांक 18 नोव्हेंबर रोजी पोलीस ठाण्यात निवेदन बदलीसाठी निवेदन देणारे युवासेना उपजिल्हाप्रमुख विश्वजीत पाटील पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांची बैठक बोलावून गैरसमजुतीतून हा प्रकार घडला असून या दोघांमध्ये सलोखा निर्माण करण्यात आला या प्रसंगी शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार गणेश पांढरे शिवसेना शहर प्रमुख संजय तायडे आदी उपस्थित होते