जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे काल संध्याकाळ 8 वाजेला महेश ज्ञानेश्वर पाटील हा महादेव मंदिर पिंपळगाव बुद्रुक येत्यावेळी ढोल ताशा सह फटाके फोडून जंगी स्वागत करण्यात आले, यावेळी माजी सरपंच नानाभाऊ पाटील तसेच ग्रामपंचायत सदस्य सुधाकर महाजन यांच्या हस्ते फुलगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला, महेश हा 3 वर्षाच्या असतांनाच आईचा मृत्यू झाला होता आणि 2007 मध्ये वडिलांचाही मृत्यू झाला होता, यामुळे महेश वर मोठे संकट कोसळले होते, महेश हा कठीण परिस्थितीतून बाहेर येऊन आज महाराष्ट्र पोलीस मध्ये निवड झाल्यामुळे गावातील आनंदाचे वातावरण तयार झाले,
यावेळी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जामनेर तालुका अध्यक्ष: संतोष पांढरे साईमत पत्रकार, यांच्यासह गावातील माणिक देवचंद पाटील, भागवत पाटील (पोलीस पाटील), माधव पाटील, संजय मोहने संतोष पाटील शिवचरण पाटील, रामदास लक्ष्मण पाटील प्रदीप पाटील मा. ग्रा.पं. सदस्य सुरेश पाटील, रवींद्र महाजन, दिलीप पाटील, आमीन जब्बार तडवी, जिलानी तडवी, दीपक सुपडू पाटील, रामदास लक्ष्मण पाटील, राहुल पाटील, तुराब तडवी, हसन तडवी, युवराज पांढरे, उपस्थित होते,