पहुर.ता.जामनेर, प्रतिनिधी । येथील पोलिस ठाण्याअंतर्गत काल दि.३१ रोजी रात्री१०वाजेपासून सकाळी ४वाजेपर्यंत नाकाबंदी करण्यात आली.
यावेळी एकुण१३०वाहनांची तपासणी करण्यात आली. तसेच २५ वाहनांवर मोटार वाहन कायदे अंतर्गत कारवाई करण्यात आली.
पहुर पोलिस ठाण्याअंतर्गत सर्व प्रमुख शहरातील विविध व्यवसाय वेळेत नियमांचे पालन करत बंद करण्यात आले. नाकाबंदी मध्ये स्वतः पोलिस निरीक्षक अरुण धनवडे सहभागी होते.
पहुर पोलिस ठाण्या अंतर्गत प्रमुख शहरातील पहुर, शेंदुर्णि व फत्तेपूर येथे नाकाबंदी करण्यात आली.
पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या सह पोलिस उपनिरीक्षक दिपक मोहिते, पोहेकाँ शशिकांत पाटील,पो.काँ.जवानसिंग राजपूत, ज्ञानेश्वर ठाकरे, गोपाल माळी, श्रीराम धुमाळ, रवींद्र देशमुख, मेघराज चव्हाण, किरण शिंपी, प्रशांत विरणारे, प्रविण चौधरी, अनिल राठोड, प्रदिप चौधरी, आदींनी कारवाई केली.