जामनेर : प्रतिनिधी
पश्चिम बंगाल मध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्या नंतर सत्तेत आलेल्या तृणमुल कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयावर हल्ला करून तेथील महिला पदाधिकार्यांवर अमानुष पणे अत्याचार केले. तेथील कार्यकर्त्यांची हत्या केली. तसेच अनेक घरांना, व्यवसायांच्या ठिकाणांना आगी लावण्यात आल्या. अशा प्रकारे लोकशाहीची हत्या करण्यात आली आहे. सदरील घटना ही भारतीय राज्य घटनेचा अपमान करणारी असून हल्ला करणार्या तृणमुल कॉंग्रेसच्या गुंडांवर कठोर कारवाई करण्यात यावी या आशयाचे निवेदन भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज येथील तहसीलदार अरुण शेवाळे यांना देण्यात आले.
यावेळी माजी मंत्री आ. गिरीष महाजन, भाजपा तालुका अध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, मा. जि.प. अध्यक्ष दिलीप खोडपे सर, प.स. सभापती जुलाल तडवी, शहर अध्यक्ष अतिश झाल्टे , तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा नीलेश चव्हाण, गट नेते न.प. प्रशांत भोंडे, सरचिटणीस रविंद्र झाल्टे , नगरसेवक उल्हास पाटील, शेख नाजिम शेख वजीर, सुहास पाटील, बंटी वाघ, दत्तू सोनवणे, दीपक तायडे, आनंदा लाव्हारे, मयुर राजेंद्र पाटील, कैलास पालवे, तेजस पाटील, बाळू चव्हाण, रामकिशन नाईक, हेमंत वाणी, गोपाल नाईक, भाईदास चव्हाण, मंगेश राजपूत आदिसह पदाधिकारी उपस्थित होते.