पंकज विद्यालय भारतात ४६ तर महाराष्ट्रात पाचव्या रँक पारितोषिकाने सन्मानित

0
15

चोपडा, प्रतिनिधी । एज्युकेशन वर्ल्ड मानवी विकास मासिक यांनी केलेल्या सर्वेक्षणामध्ये भारतातील साडेतीन हजार शाळांपैकी पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलने १५५० पैकी १०६५ गुण प्राप्त करून भारतातील सर्वोत्तम डे कम बोर्डिंगचा पुरस्कार प्राप्त केला आहे.

भारतातील शैक्षणिक क्षेत्रातील सर्वात जास्त वाचले जाणारे प्रचलित मासिक एज्युकेशन वर्ल्ड व संशोधन केंद्र यांनी केलेल्या शाळा रँकिंग सर्वेक्षणामध्ये सदर शाळेची निवड झाली. ही निवड करण्यासाठी विविध मापदंडाचा विचार केला गेला. जसे की सह अभ्यासक्रम क्रियाकलाप, विद्यार्थ्यांची वैयक्तिक उपस्थिती, शैक्षणिक प्रतिष्ठा, अध्यापन शास्त्र व क्षमता विकास, शिक्षण परिणामकारकता , नेतृत्व गुणवत्ता, पालकांचा सहभाग, पायाभूत सुविधांची तरतुद, पैशाचे मूल्य, मानसिक व भावनिक आरोग्य सेवा, समुदाय सेवा इ. मापदंडाचा विचार करण्यात आला.

१८ डिसेंबर २०२१ रोजी हॉटेल लीला अंबिएन्स गुडगाव दिल्ली येथे शाळेच्या गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, प्राचार्य मिलिंद पाटील यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी भावी शहा, संपादक दिलीप ठाकरे यांच्या हस्ते गौरवचिन्ह स्वीकारले.

पंकज ग्लोबल पब्लिक स्कूल नेहमी विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी विविध क्षेत्रात आपल्या पाउलखुणा टाकत आहे, त्याचेच फलित म्हणून हे यश संपादन केले आहे. महाराष्ट्रातील नामांकित शाळा संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर, ध्रुव ग्लोबल स्कूल संगमनेर, द हेरिटेज स्कूल, तळेगाव- पुणे च्या संचालक समयव्येत सत्कार सोहळा पार पडला. या पुरस्कारासाठी किरण चौधरी यांनी विशेष परिश्रम घेतले.

संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपडाचे अध्यक्ष पंकज बोरोले यांच्या विशेष मार्गदर्शनाखाली प्राचार्य मिलिंद पाटील व किरण चौधरी यांनी कार्य पूर्ण करून शिखर गाठले. या पुरस्काराने शाळेने शैक्षणिक क्षेत्रात अव्वल स्थान प्राप्त केले आहे.

या नेत्रदीपक यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश पंडित बोरोले, उपाध्यक्ष अविनाशजी राणे, संचालक पंकज बोरोले, नारायण बोरोले , गोकुळ भोळे , पंकज प्राथमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक एम.व्ही. पाटील, माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयचे मुख्याध्यापक व्ही.आर.पाटील, कला शास्त्र वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महादेव वाघमोडे , पंकज बालसंस्कार केंद्राच्या विभाग प्रमुख सौ. रेखा पाटील, पंकज इंग्लिश मेडीयम स्कूल च्या प्राचार्या सौ. निता पाटील यांनी अभिनंदन केले आहे…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here