पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलच्या रणवीर देशमुख यांची शंभर टक्के शिष्यवृत्तीसाठी निवड

0
20

चोपडा, प्रतिनिधी । चोपडा येथील पंकज ग्लोबल पब्लिक स्कूलचा इयत्ता बारावीत शिकणारा विद्यार्थी रणवीर राहुल देशमुख याची डार्ट माऊथ विद्यापीठात शंभर टक्के शिष्यवृत्तीसाठी निवड झाली असल्याचे पत्र प्राचार्य मिलिंद पाटील यांना प्राप्त झाले आहे.रणवीरच्या पुढील चार वर्षाची शैक्षणिक निधी २ कोटी ४० लाख एवढी असून त्याचे संपूर्ण शैक्षणिक शुल्क माफ झाले आहे. घरापासून नेण्याचे तसेच शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सोडण्याची सर्व व्यवस्था व खर्च कॉलेज करणार आहे.

या मिळालेल्या नेत्रदीपक यशाबद्दल पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे संचालक तथा रोटरी क्लब ऑफ चोपड़ा अध्यक्ष पंकज बोरोले यांच्या हस्ते शाळेत रणवीरचा गौरव करण्यात आला.

याप्रसंगी पंकज प्राथमिकचे मुख्याध्यापक एम. व्ही .पाटील ,माध्यमिक व उच्च माध्यमिकचे मुख्याध्यापक व्ही. आर. पाटील , महाविद्यालयाचे प्राचार्य महादेव वाघमोडे ,इंग्लीश मिडीयम च्या प्राचार्या सौ नीता पाटील, पंकज ग्लोबलचे प्राचार्य मिलिंद पाटील, वस्तीगृह प्रमुख के. पी .पाटील, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते.

रणवीरच्या या यशामागे सिंहाचा वाटा प्राचार्य मिलिंद पाटील यांच्या असून त्यांनी वेळोवेळी अमेरिकेतील विद्यापीठात केलेल्या पाठपुरावाचे हे फलित आहे. तसेच रणवीर देशमुखला त्याचे विषय शिक्षक के .पी. पाटील, कृष्ण कुमार शुक्ला, चंद्रकांत पाटील, इब्राहिम तडवी आदी शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याला मिळालेल्या यशाबद्दल पंकज शैक्षणिक सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुरेश पंडित बोरोले उपाध्यक्ष अविनाश राणे, नारायण बोरोले, गोकुळ भोळे यांनी भ्रमणध्वनी द्वारे त्याचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. रणवीर देशमुखने घेतलेली यशस्वी भरारीमुळे त्याचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here