निळे निशाण सामाजिक संघटनेची जिल्हा बैठक संपन्न

0
19
भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर

यावल, प्रतिनिधी । दिनांक १५ रोजी जळगाव येथील पद्दमालय विश्राम गृह येथे जळगाव जिल्हा निळे निशान पदाधिकारी कार्यकर्ते यांची बैठक संपन्न झाली.

बैठकीचे प्रमुख मार्गदर्शक तथा संस्थापक / अध्यक्ष आनंदभाऊ बाविस्कर यांच्या उपस्थितीत पार पडली या बैठकीत सामाजिक स्तरावरील विविध समस्यावर चर्चा करून संस्थापक / अध्यक्ष यांनी संघटनेची भूमिका काय व कशी या बद्दल मार्गदर्शन केले.

बैठकी दरम्यान राहुलभाऊ शिरसाठ यांची जळगाव महानगर अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली तसेच अशोक तायडे जिल्हा उपाध्यक्ष , किशोर तायडे जळगाव महानगर उपाध्यक्ष , दिपक लोहार भुसावळ युवा तालुका अध्यक्ष , अब्दुल फारुकी यावल तालुका उपाध्यक्ष , विष्णू भालेराव यावल शहर अध्यक्ष , विजय धनगर रावेर तालुका युवा अध्यक्ष , महेंद्र महाले भुसावळ शहर अध्यक्ष इ. पदाधिकाऱ्याची पुष्पगुच्छ देऊन नियुक्ती करण्यात आली.

त्या प्रसंगी उत्तर महाराष्ट्र प्रवक्ते अॅड. गौतमजी सांळुखे , जिल्हा नियोजन समिती प्रमुख महेशजी तायडे , जिल्हा नियोजन समिती उपाध्यक्ष सदाशिवजी निकम , जिल्हा रोजगार मंच अध्यक्ष युवराज सोनवणे , तसेच जिल्हातिल रावेर तालुका अध्यक्ष चंद्रकांत गाढे , यावल तालुका अध्यक्ष विलास भास्कर , पाचोरा तालुका अध्यक्ष भैय्या बागवान , रावेर युवा तालुका अध्यक्ष विजय धनगर , यावल युवा तालुका अध्यक्ष विशाल तायडे , रावेर तालुका उपाध्यक्ष सुधिर सैंगमिरे , नारायण सवर्णे तसेच रावेर तालुक्यातिल अरविंद भालेराव , धिरज तायडे , शेख रशीद , पाचोरा तालुका शहर अध्यक्ष सागर गिरी इतर सर्व तालुक्यातिल पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थितीत होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here