नानासाहेब य.ना. चव्हाण महाविद्यालयात युवा कवी संमेलन रंगले

0
2
चाळीसगाव – प्रतिनिधी मुराद पटेल 
येथील नानासाहेब यशवंतराव नारायणराव चव्हाण कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयातील मराठी विभाग,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष आणि नँक सातवा निकष समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यस्तरीय युवा कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले.
      युवा कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. एस. आर. जाधव यांनी भूषविले. त्या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य,अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष समन्वयक प्रा.डॉ.जी.डी.देशमुख उद्घाटक म्हणून तर प्रमुख अतिथी उपप्राचार्य डॉ.एस.डी. महाजन, उपप्राचार्या डॉ.यु.आर.मगर, प्रा.के.पी.रामेश्वरकर, डॉ. यू.पी. नन्नवरे,प्रा.पूजा महाले,डॉ.एन.पी. गोल्हार, प्रा.एस.एन.पाटील, प्राध्यापक बंधू-भगिनी,शिक्षकेतर कर्मचारी, काव्यप्रेमी कवी, साहित्यिक व विद्यार्थी उपस्थित होते.
    कविश्रेष्ठ वि.वा.शिरवाडकर जयंती विशेष मराठी राजभाषा गौरव दिनानिमित्ताने आयोजित केलेल्या युवा कवी संमेलनाचे उद्घाटन डॉ.जी.डी. देशमुख यांनी केले. महाराष्ट्रातील डॉ.कृष्णा भवारी सांगली, भावेश बागुल सुरगाणा,सुभाषचंद्र सोनकांबळे पालघर, प्रा.नीरज आत्राम आनंदवन वरोरा, डॉ.संजय बोरुडे अहमदनगर, गौतमकुमार निकम चाळीसगाव, सुनील गायकवाड चाळीसगाव,दिनेश चव्हाण चाळीसगाव, जिजाबराव वाघ चाळीसगाव, डॉ. विजय शिरसाठ चाळीसगाव इ. मान्यवर कवींची उपस्थिती होती. युवा कवी संमेलनात युवा कवी भावेश बागुल यांनी सुरगाणा परिसरातील कौटुंबिक व सामाजिक जाणीव व्यक्त करणाऱ्या ‘कासरा’ आणि ‘गलोल’  ह्या दोन कवितांचे सादरीकरण केले, कवी सुभाषचंद्र सोनकांबळे पालघर यांनी ‘लेकीचा सहारा’ आणि ‘वीर माता’, कवी नीरज अत्राम यांनी शेतकऱ्यांची झालेली दैन्यावस्था व्यक्त करणारी ‘टाहो’आणि देशभक्तीपर ‘मातृभूमीला वंदन’ ही कविता, डॉ.संजय बोरुडे अहमदनगर यांनी ‘माती मेळाणं’ आणि ‘स्रीजीवन’, दिनेश चव्हाण यांनी ‘कविता’आणि माहेराचे कौतुक करणारी सासुरवाशीणीचे मनोगत व्यक्त करणारी ‘माहेरनी गोडी’ही अहिराणी कविता सादर केली.डॉ. उज्वला नन्नवरे ‘अस्तित्व’,गौतम कुमार निकम यांनी ‘पेरणी’ व ‘परिवर्तनाचे वारे’, सुनील गायकवाड यांनी युवकांच्या व्यसनाधीनतेवर ‘बढाई’ ही आणि सामाजिक शैक्षणिक या विषयावर ‘एकलव्य’, डॉ.कृष्णा भवारी यांनी ‘खंत’ आणि ‘माणुसकीच्या शोधात’, जिजाबराव वाघ यांनी ‘कोरोना’आणि ‘प्रेम’,डॉ. विजय शिरसाठ यांनी ‘शेकडो एकर जमीन तुमची’ आणि आई मुलाचे नाते दर्शवणारी अहिराणी कविता सादर केली. सर्वच युवा कवींनी कविता सादरीकरणातून प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
     युवा कवी संमेलनाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.एस. आर.जाधव यांनी कविसंमेलनात सहभागी झालेल्या सर्व युवा कवींचे मनःपूर्वक स्वागत केले. आणि उपस्थितांना मार्गदर्शन केले. आजच्या परिस्थितीत ग्रामीण भागातील कष्टकऱ्यांचे जीवन, पोटाचा प्रश्न किती गंभीर आहे, हा प्रश्‍न भावेश बागूल यांनी त्यांच्या कासराआणि गलोल कवितेतून व्यक्त केला.सुभाषचंद्र सोनकांबळे यांनी आपल्या कवितेतून नावीन्यपूर्ण संकल्पना व्यक्त केली. ती म्हणजे ग्रामीण भागातील शेतकरीला वाचविण्यासाठी त्यांची मुलगी बापाने बरेवाईट करू नये म्हणून ती बापावर पहारा ठेवते आणि कितीही कर्ज असले तरी मी शिक्षण घेऊन ते कर्ज फेडून टाकेल अशी ग्वाही ती बापाला देते. तसेच दहशतवादाविरुद्ध अतिशय संवेदनशील कविता वीर मातेची गाथा ही कवीता सुभाषचंद्र सोनकांबळे यांनी सादर केली. नीरज आत्राम यांनी अतिवृष्टीने भयभीत झालेल्या शेतकऱ्यांची गंभीर परिस्थितीचे वर्णन या कवितेतून तर मातृभूमीला वंदन या कवितेतून भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांचे देशासाठी बलिदान ,छत्रपती शिवाजी महाराज यांचा पराक्रम, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची देशाच्या प्रगतीसाठी असलेले दूरदृष्टी त्यांनी कवितेतून व्यक्त केली. डॉ.संजय बोरुडे यांनी माती मेळाणं व स्रीवादी जीवन या कवितेतून पुरुष्यांच्या नजरेचा खेळ प्रखरतेने जाणीव करून दिली. कवी दिनेश चव्हाण यांनी कविता वरचे प्रेम आणि माहेर निगोडी ही अहिराणी कविता सादर करुन माहेरा विषयीचे प्रेम सासरवाशीणीच्या मनातून व्यक्त केले. डॉ.उज्ज्वला नन्नवरे यांनी अस्तित्व या कवितेतून शेतकऱ्यांचे अस्तित्व काय आहे या विषयावर प्रकाश टाकला तर गौतमकुमार निकम यांनीही पेरणी या कवितेतून समतेची व मानवतेची पेरणी व परिवर्तनाचे वारे या कवितेतून परिवर्तनाची दिशा दाखवली. सुनील गायकवाड यांनी युवकांच्या व्यसनाधीनतेवर बढाई ही कविता आणि सामाजिक व शैक्षणिक जाणीव व्यक्त करणारी एकलव्य ही कविता तसेच डॉ.कृष्णा भवारी यांनी खंत आणि माणुसकीच्या शोधात या दोन कवितातून माणुसकी हरवल्याची खंत व्यक्त केली. जिजाबराव वाघ यांनी कोरोना काळात नाशिक येथे ऑक्सिजन कमतरता निर्माण झाल्यानंतर जी गंभीर परिस्थिती निर्माण झाली त्याचे वर्णन कोरोना कवितेतून व्यक्त केले व प्रेम हि कविता सादर केली. डॉ.विजय शिरसाट यांनी माझ्या खान्देशच्या भूमीत या कवितेतून शिक्षणासाठी बाहेर असलेल्या मुलाची दिवाळीनिमित्त आईला आठवण होते व शेकडो एकर जमीन तुमची ही कविता सादर करून प्रस्थापितांची वास्तवता स्पष्ट करून गेली.
प्राचार्य डॉक्टर एसर जाधव पुढे म्हणाले की नवोदित कवींनी आपल्या कवितांमधून जे सामाजिक भान जगण्यासाठी दिले आहे ते आपण सर्वांनी नजरेसमोर ठेवून आचरण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, तरच आपला देश सुसंस्कारित व प्रगती पथकाकडे जाईल असे आव्हान उपस्थितांना केले.
   युवा कवी संमेलनाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.एस.आर.जाधव यांनी अनमोल मार्गदर्शन केले.डॉ.जी.डी.देशमुख, डॉ.एस.डी.महाजन डॉ. यु.आर.मगर,प्रा.के.पी.रामेश्वरकर,डॉ.उज्वला नन्नवरे,प्रा.पूजा महाले,डॉ.निमा गोल्हार, प्रा.एस. एन.पाटील यांनी परिश्रम घेतले.युवा कवी संमेलनाचा दोनशेपेक्षा जास्त श्रोत्यांनी आस्वाद घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here