जामनेर : प्रतिनिधी
जामनेर तालुका संभाजी ब्रिगेडच्या वतीने धरणगाव येथील चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ जामनेर तहसीलदार यांना निवेदन सादर केले
या निवेदनात छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य मध्ये महिलांना प्रचंड सन्मान केला जात होता महिलांचा आदर केला होता महिला शत्रूची जरी असली तरी तिचा सन्मान छत्रपती शिवाजी महाराज यांनी केला परंतु त्याच महाराष्ट्र मध्ये अत्यंत लाजिरवाणी अशी घटना धरणगाव मध्ये वय वर्ष 65 या असणाऱ्या चंदुलाल मराठे नराधमाने वय वर्ष 6 व 8 वर्ष असणाऱ्या चिमुरड्यांवर अत्याचार केला या दोघी बालिका ची अवस्था गंभीर असूनया घटनेचा त्यांच्यावर दोघांवर परिणाम झालेला आहे जलदगती न्यायालयात लवकरात लवकर फाशीची शिक्षा देण्यात येईल अशी मागणी या निवेदनात केली आहे
या निवेदनात संभाजी ब्रिगेड चे तालुकाध्यक्ष राम अपार डॉक्टर प्रशांत पाटील दिलीप साळुंके मुकेश दामोदर ज्ञानेश्वर पाटील योगेश पाटील बंडू पाटील प्रवीण गावंडे संदीप पाटील तेली समाज जिल्हा कार्याध्यक्ष वैशाली चौधरी माधुरी चौधरी संतोष कुमावत आदींच्या सह्या आहेत


