देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये आता होणार मोफत उपचार

0
3
देवकर मल्टिस्पेशालिटीमध्ये आता होणार मोफत उपचार

जळगाव, प्रतिनिधी । येथील शिरसोली रस्त्यावरील श्री. गुलाबराव देवकर मल्टिस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयात राज्य शासनाची महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्मान भारत योजना लागू झाली आहे. त्यामुळे या रुग्णालयातील अत्याधुनिक व दर्जेदार आरोग्यसेवेचा मोफत लाभ पात्र लाभार्थ्यांना घेता येणार आहे.

कोविडच्ज्ञा दुसऱ्या लाटेतील रुग्णांवरील सेवाभावी आणि अत्यंत यशस्वी उपचारानंतर गेल्या 22 जुलैपासून हे रुग्णालय मल्टिस्पेशालिटी आरोग्यसेवेसाठी सुरू झाले आहे. रुग्णालयात सर्व अत्याधुनिक यंत्रणा, तंत्रज्ञ व विविध आजारांवरील तज्ञ डॉक्टरांची सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

दर्जेदार आरोग्य सेवा
शासनाच्या योजना अनेक रुग्णालयांना लागू झाल्या असल्या, तरी एकाच छताखाली मुंबई-पुण्याच्या तोडीस तोड पंचतारांकित आरोग्यसेवा व विविध आजारांवरील उपचार एकाच छताखाली उपलब्ध असल्याने मोफत उपचारासाठी नागरिकांना त्याचा मोठा लाभ होणार आहे. या मोफत उपचारात विविध प्रकारच्या महागड्या शस्त्रक्रिया देखील केल्या जाणार आहेत. शासनाने ठरवून दिलेल्या निकषानुसार संपूर्ण अध्यावत यंत्रणा, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता, संपूर्ण प्रशिक्षित आणि विनम्र असा नर्सिंग स्टाफ उपलब्ध करून देण्यात आला आहे त्यामुळे रुग्णांना मोफत उपचार घेताना रुग्णालयातील उच्च दर्जाच्या सोयी-सुविधांचा लाभ घेण्याचे समाधान निश्चित मिळणार आहे.

रुग्णालयात स्वतंत्र पॅथॉलॉजी लॅब उपलब्ध असून 14 घाटांचा अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज असा आयसीयू विभाग उपलब्ध आहे. त्याला जोड म्हणून गरजू रुग्णांना 24 तास ऑक्सिजनची सेवा उपलब्ध व्हावी, यासाठी रुग्णालयाचा स्वतःचा ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. रुग्णालयासंदर्भात अधिक माहितीसाठी डॉ. नितिन पाटील मो क्रमांक 9422977071 व 7507724200 या वर संपर्क साधावा, असे रुग्णालय प्रशासनाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here