तारक मेहतामधील ‘बबीता’ अटकेत

0
46

मुंबई, वृत्तसंस्था । ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ फेम बबीता उर्फ अभिनेत्री मुनमुन दत्ता सोमवारी हरियाणाच्या हांसी पोलीस ठाण्यात पोहोचली. तेथे पंजाब आणि हरियाणा हायकोर्टाने आदेशानुसार एका विशिष्ट समाजावर टिप्पणी केल्याप्रकरणी / ऍक्ट मधील तपास अधिकारी डीएसपी विनोद शंकर यांच्यासमोर सादर करण्यात आली.

हिसार येथील एससी/एसटी कायद्यांतर्गत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाने मुनमुन दत्ताची अटकपूर्व जामीन याचिका 28 जानेवारी रोजी फेटाळली होती. एका कार्यक्रमात अभिनेत्री मुनमुन दत्ताने एका विशिष्ट जातीविरोधात चुकीची टिप्पणी केली होती, त्याच प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता.यानंतर मुनमुन दत्ताने अटकपूर्व जामिनासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा आसरा घेतला होता. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे न्यायाधीश अवनीश झिंगन यांनी 4 फेब्रुवारी रोजी दिलेल्या आदेशात मुनमुन दत्ताला हंसी येथील तपास अधिकाऱ्यासमोर हजर राहण्यास सांगितले होते.मुनमुन दत्ताला अटक करून चौकशीअंती अंतरिम जामिनावर सोडण्यात यावे, असे आदेश तपास अधिकाऱ्यांना देण्यात आले. याशिवाय 25 फेब्रुवारी रोजी चौकशी अहवाल उच्च न्यायालयात सादर करण्याचे निर्देश चौकशी अधिकाऱ्यांना देण्यात आले.

विशेष म्हणजे, गेल्या वर्षी 9 जानेवारी रोजी मुनमुन दत्तावर यूट्यूबवर एक व्हिडिओ जारी करून अनुसूचित जातींबद्दल अपमानास्पद टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता.यावर हांसी येथील दलित हक्क कार्यकर्ते रजत कलसन यांनी मुनमुन दत्ता विरुद्ध हांसी पोलीस ठाण्यात एससी एसटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला होता. त्यांनी याआधी क्रिकेटर युवराज सिंग आणि इतर अनेक सेलिब्रिटींवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणांची सुनावणीही सुरू आहे. जोधा अकबर या चित्रपटातील व्यक्तिरेखा साकारणारी युविका चौधरीही हंसी येथील पोलीस ठाण्यात पोहोचली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here