Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»यावल»तलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळाले?आणि रात्री 8:30 वाजता पार्टी
    यावल

    तलाठी समक्ष सकाळी 8:30 वाजता वाळूचे ट्रॅक्टर सोडले का पळाले?आणि रात्री 8:30 वाजता पार्टी

    saimat teamBy saimat teamNovember 15, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    भुसावळात आढळला एक नवीन रुग्ण; संख्या चारवरून पाचवर
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    यावल, प्रतिनिधी । काल दि.14 रविवार रोजी सकाळी आठ तीस वाजता तालुक्यातील एका तलाठ्याच्या समक्ष भुसावल रोडवर पेट्रोल पंपाजवळ वाळूने भरलेले एक ट्रॅक्टर सुसाट वेगाने पळून गेले किंवा त्या ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई होऊ नये म्हणून सोडून देण्यात आले का? तसेच संध्याकाळी आठ तीस वाजता भुसावल रोडवरच एका हॉटेलात 2ते3 तलाठी आणि पश्चिम भागातील एक वाळू तस्करांची पार्टी झाल्याने तालुक्यात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

    याबाबत सविस्तर माहिती अशी की वाळूने भरलेला ट्रॅक्टर सुसाट वेगाने जात असल्याची माहिती तापी नदी किनारपट्टी जवळील गावातील एका तलाठ्याला दिसले असता त्या वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरचा पाठलाग त्या तलाठ्याने केला. वाळूने भरलेल्या ट्रॅक्टरला थांबवले सुद्धा परंतु संबंधितांमध्ये आपापसात काय चर्चा झाली त्यानंतर वाळूने भरलेला ट्रॅक्टर तिथून सुसाट वेगाने पळून गेले सदरची घटना पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये बंद झालेली आहे तसेच एकाने या घटनेचे आपल्या मोबाईल मध्ये व्हिडिओ चित्रण सुद्धा केले आहे वाळूने भरलेला ट्रॅक्टर चालक जर पळून गेला असेल तर त्याविरुद्ध यावल पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तसेच संध्याकाळी आठ तीस वाजता यावल शहराजवळील भुसावळ रोडवर एका हॉटेलमध्ये पश्चिम भागातील गब्बर वाळूतस्कर यांच्या उपस्थितीत तालुक्यातील दोन ते तीन तलाठी यांच्यात पार्टी झाल्याचे संपूर्ण यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहे. प्रांताधिकारी कैलास कडलक यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी केल्यास अवैध वाळू वाहतूक ट्रॅक्टर चालकासह त्यासंबंधित तलाठी यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल केला जाऊ शकतो असे सुद्धा बोलले जात आहे.

    गुरुवारी वाळू तस्करांना “गुरुचा” दणका वसतो.
    यावल तहसीलदार यांच्या दुर्लक्ष पणामुळे अवैध वाळू वाहतूक दारांवर कारवाई करण्यासाठी वेगवेगळे पथक नियुक्त करण्यात आले होते परंतु ते पथक आता सक्रिय नसल्याने वाळू तस्करांच्या सोयीचे झाले आहे,दर गुरुवारी मात्र पश्चिम भागातील एक मंडळ अधिकारी ( वाळू तस्करांचे कर्दन काळ असलेले गुरु ) संपूर्ण तालुक्यात गस्त घालून अवैध वाळू वाहतूक दारांवर कारवाई करीत असल्याने इतरांच्या हप्ते बाजीवर मोठा विपरित परिणाम होत असल्याने त्या कर्तव्यदक्ष मंडळ अधिकाऱ्याविरुद्ध महसूल विभागात काही सर्कल,तलाठी आपल्या महसूल यंत्रणेमार्फत शासकीय स्तरावर षडयंत्र रचत असल्याचे सुद्धा महसूल विभागात बोलले जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Yaval : शासनातर्फे देण्यात आलेला देय भत्ता स्वाभिमानी पोलीस अधिकारी

    January 17, 2026

    Yaval : ८ वर्षीय ओमने पार केले अडीच तासांत १७ किमी सागरी अंतर

    January 12, 2026

    Yaval:यावल तालुक्यातील रस्त्यांची दयनीय अवस्था आणि बेसुमार वृक्षतोड, नागरिक नाराज

    January 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.