‘…तर मला काही तेवढाच उद्योग नाही’; अजित पवारांचा पारा गरम

0
4
मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील पूरस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आढावा

राज्याच्या राजकीय वर्तुळात सध्या ईडीचीच चर्चा सुरू आहे. ईडीच्या कारवाईप्रकरणी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) नाराजी व्यक्त केली. ‘मला सांगा, धाडी कुठे पडल्या’, असा अजित पवारांनी केला. माझा दुरान्वये संबध नसताना बारामतीमधील एका जमिनीबद्दल उच्च न्यायालयामध्ये केस दाखल, अशी बातमी पाहण्यास मिळाली. यात काही संबध नसताना अशा खोट्या बातम्या समोर आणल्या जात आहे.’ यावरून पवार संतप्त पाहायला मिळाले.

यावेळी अजित पवार यांनी पुण्यात माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “माझा दुरान्वये संबध नसताना बारामतीमधील एका जमिनीबद्दल हायकोर्टात केस दाखल, अशी बातमी पाहण्यास मिळाली. काही संबध नसताना अशा धादांत खोट्या बातम्या समोर आणल्या जात आहेत. यामुळे लोकांमधील माध्यमांवरील विश्वास उडत चालला आहे.”

याविरोधात कायदेशीर मार्गाने जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी विचारला. यावर ते म्हणाले की, “मला काही तेवढाच उद्योग नाही. मी सकाळी सहा वाजल्यापासून काम करतो. कुठे कायदेशीर कारवाईसाठी मागे लागता. वकील द्या, त्यांच्या मागे जा एवढेच धंदे आहेत का आमच्याकडे?” या गोष्टींची नोंद सर्व संपादकांनी घ्यावी, ही माझी कळकळीची विनंती.’ असे आवाहन अजित पवार यांनी केले.

लॉकडाउनची वेळ राज्यावर आणू नका

राज्यातील काही भागात कोरोना रुग्णसंख्या पुन्हा वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे राज्यातील मंदिरं खुली करण्याची मागणी भाजपासह मनसेकडून केली जात आहे. या दोन्ही मुद्द्यांवर बोलताना अजित पवार यांनी पुन्हा निर्बंध लावण्याची वेळ आणू नका असा इशारा दिला आहे. यावर अजित पवार म्हणाले की, “केंद्राच्या सांगितल्याप्रमाणे, केरळ पहिल्या क्रमांकावर आणि महाराष्ट्र दुसर्‍या क्रमांकावर आहे. यावेळी सर्वांना काळजी घेण्याची गरज आहे. कुठेही नियम पाळले जात नाही. लोकांमध्ये गोड गैरसमज असल्यामुळे तिथे संख्या वाढायला लागलेली आहे. म्हणूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे वेळोवेळी आव्हान करतात.”

शाळा सुरू करण्याबद्दल दोन मतप्रवाह…

शाळा सुरू करण्याच्या मुद्द्यावरही अजित पवार यांनी भाष्य केले. “शाळा सुरू करण्याबद्दल सध्या दोन मतप्रवाह दिसत आहेत. यामध्ये काही लोक म्हणतात दिवाळीनंतर, तर काही लोकांच्या मते, कोरोनामुक्त असणाऱ्या ठिकाणी शाळा सुरू कराव्यात. पण, शाळा कधी सुरू करायच्या. याबाबत मुख्यमंत्रीच अंतिम निर्णय घेतील.” असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here