जळगाव ः प्रतिनिधी
तरुणांनी नोकरीच्या मागे न धावता उद्योग व्यवसायाकडे वळावे, असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी माळी साम्राज्य व समता विचार फाउंडेशनच्या उद्योजक मेळाव्यात केले.
कांताई सभागृहात रविवारी झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते. फाउंडेशनचे प्रमुख भूषण महाजन यांनी प्रास्ताविक केले. जि.प. सदस्य नाना महाजन, उद्योजक दिलीप पाटील, नगरसेविका सरिता नेरकर, राजेश महाजन, कमलाकर चौधरी, संध्या माळी, संजय महाजन उपस्थित होते.
उद्योजक मुरलीधर महाजन, राजेश महाजन,उद्योजक कमलेश चौधरी यांनी विचार मांडले.जयश्री महाजन, समाधान माळी, कमलाकर माळी, नीलेश माळी, विजय महाजन, राकेश महाजन, दिनेश महाजन, विजू माळी, मनोज महाजन, प्रशांत महाजन, सुनील कोळी, नितीन महाजन, जयेश माळी यांनी सहकार्य केले.
मेळाव्यात झाला गौरव
वरणगावचे सुभाष महाजन यांना समाजभूषण पुरस्कार. स्मार्ट उद्योजक म्हणून अंबादास व्यवहारे (पुणे), एम. आर. महाजन, अर्चना माळी, संजय महाजन, मनीष जाधव, गजानन महाजन, नितीन थोरात, रवींद्र माळी, जितेंद्र महाजन (सर्व जळगाव), श्रीकृष्ण उबाळे (जामनेर), संजय खैरनार (औरंगाबाद), विजया गारुडकर (अहमदनगर), रामभाऊ महाजन (रावेर), मधुकर खैरे (कल्याण), महेश माळी (कापडणे), रोहित अभंग (नाशिक), हरी माळी (मुक्ताईनगर), दीपक माळी (चोपडा), राजेश महाजन (कोळगाव), अजिंक्य माळी, सुनील माळी (पुणे).
राज्यभरातील स्मार्ट उद्योजकांची माहिती व प्रेरणादायी लेख असणारी ’स्मार्ट उद्योजक स्मरणीकेचे यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी भूषण महाजन जयश्री महाजन, समाधान माळी, कमलाकर माळी, निलेश माळी, विजय महाजन, राकेश महाजन, दिनेश महाजन, विजू माळी, मनोज महाजन,
प्रशांत महाजन, सुनिल कोळी, नितीन महाजन, जयेश माळी यासह अन्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.



