जळगाव- येथील निसर्ग मित्र समिती व डॉ. भूषण मगर फाउंडेशन पाचोरा यांच्या वतीने शिवजयंती निमित्त डॉ. विलास पुरुषोत्तम नारखेडे यांना गिर्यारोहण क्षेत्रात उत्तुंग कामगिरी केल्याबद्दल सदरील पुरस्कार आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला . विविध गड -किल्ले ,अष्ट हजारी शिखरे, माऊंट एव्हरेस्ट ,अन्नपूर्णा , अशा प्रकारची अनेकविध गडकिल्ले सर करून गिर्यारोहण क्षेत्रात आपला उत्कृष्ट ठसा उमटवून खानदेशातील एक लाख युवक-युवतींना गिर्यारोहणाचे प्रशिक्षण देण्याचे कार्य काही वर्षात पूर्ण करणार आहेत . या कार्याबद्दल तसेच शिवछत्रपती महाराज यांचा सांस्कृतिक वारसा असलेले गड-किल्ल्यांची जपणूक होण्यासाठी व संरक्षण होण्यासाठी ते सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करीत असतात. या कार्याबद्दल त्यांना सदरील श्री शिवछत्रपती गिर्यारोहक पुरस्कार देण्यात आला .याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे ,उपमहापौर कुलभूषण पाटील ,डॉ. शांताराम पाटील पाचोरा ,सेवानिवृत्त फॉरेस्ट अधिकारी एस आर पाटील ,विकास वाघ, प्रा गोपाल दर्जी ,डॉ सुदर्शन पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते. तसेच पुरस्कारार्थी यांचे प्रवीण पाटील सर अक्षय सोनवणे माजी आमदार प्रा चंद्रकांतजी सोनवणे, बंडू दादा काळे ,उमेश झिरपे ,ऋषीकेश यादव ,राजू भाऊ खेडकर आदींनी डॉ नारखेडे यांचे कौतुक केले आहे . महाशय संपादक साहेब, कृपया आपल्या लोकप्रिय दैनिकातून वरील वृत्त व फोटो प्रसिद्ध करावी ही नम्र विनंती. आपला विश्वासू डॉ .विलास नारखेडे जळगाव. यांचे कौतुक केले आहे