डॉ. कुंदनदादा फेगडे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर संपन्न

0
37

यावल, प्रतिनिधी । आज दि.१४रोजी यावल तालुक्यातील डोंगर कठोरा येथे डॉ.कुंदनदादा फेगडे मित्र परिवारातर्फे आयोजित निशुल्क नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिर संपन्न झाले.सदर शिबिरात सहभागी झालेल्या रुग्णांची निशुल्क नेत्र तपासणी करण्यात आली.

यावेळी ज्या रुग्णांना मोतीबिंदू आहे अशा रुग्णांची प्राथमिक तपासणी करून त्यांना ऑपेरेशन साठी जळगांव स्थित कांताई नेत्रालय येथे रवाना केले गेले इतर रुग्णांना योग्य सल्ला व मार्गदर्शन आणि उपचार केले गेले. डॉ. कुंदन फेगडे मित्र परिवार व कांताई नेत्रालय जळगाव यांच्या वतीने रुग्णांची जाण्या येण्याची, राहण्याची व जेवणाची मोफत सुविधा करण्यात आली.

या शिबिरात एकूण १६५ नेत्र रुग्णांची तपासणी व १६ रुग्णांची मोतीबिंदू शास्त्रक्रिया साठी कांताई नेत्रालय जळगाव येथे पाठविण्यात आले. सदरील शिबिरात कांताई नेत्रालय जळगाव येथील शिबीर नियोजक युवराज देसर्डा यांनी मार्गदर्शन केले. व नेत्र चिकित्सक डॉ.संजू शुक्ला यांनी रुग्ण बांधवांची तपासणी केली.या वेळी डॉ.कुंदन फेगडे व युवराज देसर्डा यांनी रुग्णांना आपल्या मनोगतातून योग्य मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव होत्या तर कार्यक्रमाचे उद्धघाटन योगेश भंगाळे,व नवाज तडवी (सरपंच ) यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेला पुष्पहार वाहून करण्यात आले. या वेळी जिल्हा परिषद सदस्य सविता भालेराव, योगेश भंगाळे, डॉ. कुंदन फेगडे, नवाज तडवी (सरपंच ),धनराज पाटील(उपसरपंच ),यदुनाथ पाटील,उदय बाउसकर, कमलाकर राणे,लुकमान तडवी,नितीन भिरूड (माजी उपसरपंच )दिलीप तायडे, राजरत्न आढाळे(पोलीस पाटील),राहुल चव्हाण,प्रवीण जावळे,उमेश कुरकुरे,प्रकाश झोपे,पिंटू राणे,अनिल लोहार, हर्षल सोनवणे,रुबाब तडवी,मुस्तूफा तडवी,रवींद्र पाटील,आदींची उपस्थिती होती या कार्यक्रमाला सागर लोहार मनोज बारी,विशाल बारी, हर्षवर्धन मोरे आदींनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here