डॉक्टर असल्याचा बनाव, सोने व्यावसायिकाला ५० हजारांचा गंडा

0
4

चाळीसगाव | आपण डॉक्टर असल्याचे भासवून सोने व्यावसायिकाला ५० हजारांत गंडवून अज्ञात भामटा पसार झाला आहे. याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

रथगल्लीमधील मयुर प्रकाशचंद जैन (वय-३३) हे सोन्याचे व्यापारी असून त्यांची दुकान रथगल्ली येथे आहे. त्यांना ७ जानेवारी रोजी सकाळी ११:४० वाजताच्या सुमारास मयुर प्रकाशचंद जैन यांना ७७४४०४५८०४ या क्रमांकावरून फोन आला. तेव्हा मी शिवशक्ती दवाखान्यातून असिस्टंट डॉ. एस.के.जैन बोलत आहे. माझ्या घरी कार्यक्रम असल्याने मला एक तोळा सोन्याची चैन लागत आहे. त्यामुळे सोने घेऊन आपण शिवशक्ती दवाखान्यात आल्यावर पैसे देतो, असे सांगून त्या व्यक्तीने फोन ठेवला. त्यावर मयुर यांनी दुकानातील कारागीर मंगेश याला सोन्याची चैन घेऊन दवाखान्यात पाठविले. दवाखान्यात मंगेश पोहचला. मीच असिस्टंट डॉ. एस.के.जैन असून पैसे कॅबीनमधून घेऊन येतो,असे सांगून तो तरुण पसार झाला. मयुर प्रकाशचंद जैन यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here