ठाणे-डोंबिवलीत भाजपची शिवसेना विरोधात पोस्टरबाजी, एकनाथ शिंदेंना केले लक्ष्य

0
4

डोंबिवली (ठाणे) : प्रतिनिधी

कल्याण डोंबिवली महापालिकेने एप्रिल महिन्यापासून घनकचरा व्यवस्थापन शुल्क वसुलीच्या कामाला सुरुवात केली आहे. मात्र, या वसुलीला भाजपने जोरदार विरोध केला असून, भाजप आमदार रविंद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी शहरामध्ये ठिकठिकाणी पोस्टर लावत थेट पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनाच लक्ष्य केले आहे. तसेच त्यांनी केडीएमसी प्रशासनावर देखील टीका केली आहे. “कचरा कर लादणाऱ्या केडीएमसीचा निषेध”, अशा शब्दात भाजपने शहरात ठिकठिकाणी पोस्टर लावले आहेत.

 

काही दिवसांपूर्वीच भाजपा आमदार रवींद्र चव्हाण यांनी या कराच्या मुद्यावर पत्रकार परिषद घेऊन पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि केडीएमसीचे आयुक्त डॉ विजय सूर्यवंशी यांच्यावर टीकास्त्र सोडले होते. मात्र आता हा वाद आता आणखीनच चव्हाट्यावर आला आहे. पोस्टरच्या माध्यमातून केडीएमसीत थुकरटपणा कशाला? असा थेट सवाल भाजपान उपस्थित केला आहे.

रविंद्र चव्हाण यांनी हा वसूली करण्याचा निर्णय तात्काळ रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. हा कर लागू करण्याचा निर्णय घेणाऱ्या आयुक्तांच्या विरोधात कारवाई करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here