टिईटी गैरव्यवहारप्रकरणी चाळीसगावच्या शिक्षकासह दोन जण गजाआड

0
5

जळगाव | शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात टिईटी गैरव्यवहार प्रकरणाचे धागेदोरे जळगाव जिल्ह्यापर्यंत पोहचले आहे. या प्रकरणी ळीसगाव येथील एका शिक्षकांसह दोन जणांना अटक करण्यात आली.

मागील महिन्यात शिक्षक पात्रता परीक्षेतील गैरव्यवहार उघडकीस आला आहे. या प्रकरणी निलंबित आयुक्त तुकाराम सुपे, जी.ए.कंपनीचा व्यवस्थापक अश्विनकुमार शिवकुमार, आशुतोष शर्मा, निशिद गायकवाड आदींना अटक करण्यात आली आहे. हे प्रकरण सन २०१९ च्या परीक्षेतील आहे. या अगोदरही सन २०१८ मध्येही गैरव्यवहार करण्यात आल्याची माहिती उघडकीस आली. या संदर्भात पुणे सायबर पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.

पुणे सायबर पोलिसांच्या पथकाने नाशिक आणि चाळीसगाव येथून अनुक्रमे सुरंजित गुलाब पाटील (रा.तपोवन, नाशिक) आणि स्वप्निल तीरसिंग पाटील (रा.चाळीसगाव) यांना अटक केली आहे. दोघांनी मिळून ३५० परीक्षार्थींकडून सुमारे तीन कोटी ८५ लाख रुपये घेऊन ते एजंटमार्फत मुख्य आरोपींना दिल्याची बाब तपासात निष्पन्न झाली आहे. या दोन्ही संशयितांना प्रथमवर्ग न्यायलयात हजर केले असता न्यायदंडाधिकारी श्रद्धा डोलारे यांनी दोघांना १३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

स्वप्निल तीरसिंग पाटील याने सुमारे १५० परीक्षार्थींकडून प्रत्येकी एक लाख दहा हजार रुपये असे दीड कोटी रुपये एजंटमार्फत आरोपींना दिल्याचे तपासात समोर आले आहे. सुरंजित पाटील व स्वप्निल पाटील यांचे मोबाइल पोलिसांनी जप्त केले असून त्याचे तांत्रिक विश्लेषण करून आणखी पुरावे हस्तगत केले जाणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here