जि.प. सदस्या माधुरी अत्तरदे यांचे आमरण उपोषण

0
5

जळगाव : प्रतिनिधी
धरणगाव येथील तहसिलदार नितीन देवरे यांनी रुजू झाल्यापासून तालुक्यात हुकूमशाही पध्दतीने मनमानी कारभार करत नागरिकांवर व प्रशासकीय सेवेतील कर्मचार्‍यांविरुध्द वाईट हेतूची वागणुक देत असतात आदी कारणांमुळे त्यांचे निलंबन करण्यात यावे या मागणीसाठी जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे, बांभोरी येथील माजी सरपंच राकेश नन्नवरे यांच्यासह भाजप पदाधिकारी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु केले आहे.
याबाबत माहिती अशी की, जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे यांनी तहसिलदार नितीन देवरे यांच्याविरुध्द वारंवार वरिष्ठांकडे त्यांच्या कारभाराबद्दल तक्रारी दाखल केल्या होत्या. मात्र त्यांच्याविरुध्द कुठलीही कारवाई न झाल्याने सौ. अत्तरदे यांनी ३ मे रोजी जिल्हाधिकार्‍यांना लोकशाही दिनानिमित्त तक्रारी अर्ज देत उपोषणाचा ईशारा दिला होता. या अर्जात त्या म्हणाल्या होत्या की, तहसिलदार देवरे यांनी बांभोरीचे माजी सरपंच बबन नन्नवरे यांच्याविरुध्द किरकोळ सबबीवरुन अडीच लाखाचा दंड आकारला गेला तसेच तालुक्यातील तलाठी वर्गास वेठीस धरुन त्यांना अन्यायकारक वागणुक दिली जाते. तसेच कार्यालयातील कर्मचार्‍यांवरही हुकूमशाही पध्दतीने वागत तुच्छ वागणुक दिली जाते. याबाबत वरिष्ठांना अवगत केल्यावरही कोणतीही कारवाई न झाल्याने धरणगाव तालुक्यातील सर्व पिडीत नागरिकांच्या वतीने जिल्हा परिषद सदस्या माधुरी अत्तरदे व राकेश नन्नवरे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आमरण उपोषणासाठी बसले आहे. दरम्यान उपोषणस्थळी कोरोनाच्या संदर्भात नियमांचे पालन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here