जि.प. असमान निधीबाबत तक्रारीच्या चौकशीचे मंत्रालयातून आदेश

0
3

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हा परिषदेत विविध योजनांसाठी उपलब्ध असलेल्या निधीचे सदस्यांमध्ये असमान वाटप करण्यात आले आहे. यासंदर्भात माजीमंत्री एकनाथराव खडसे व जि.प.सदस्या प्रा.डॉ.निलम पाटील यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेत मंत्रालयातून चौकशीचे आदेश काढण्यात आले आहेत.

चौकशी करून स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेशात म्हटले आहे. जिल्हा परिषदेमध्ये पहिल्या फळीतील सर्वपक्षीय सदस्यांनी लॉबिग करून 25 कोटी रूपयांच्या निधीची कामे आपसात वाटून घेतल्याची तक्रार राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदस्या प्रा. डॉ. नीलम पाटील यांनी केली आहे. त्यांनी मंत्रालयात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे याबाबत लेखी तक्रार केली आहे. या तक्रारीची दखल घेत ग्रामविकास विभागाकडून जिल्हा परिषदेला शुक्रवारी चौकशीचे पत्र देण्यात आले आहे. असमान निधी वाटपाबाबत चौकशी करून मंत्रालयात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याबाबत या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here