जिल्ह्यातील ५० हजार विद्यार्थी संगणकीय प्रमाणपत्रापासून वंचित

0
3

जामनेर : प्रतिनिधी

कोरोनाच्या संसर्गाने आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक अशा सर्वच क्षेत्रावर घाला घातला आहे. त्यातच शैक्षणिक क्षेत्रातील संगणक शिक्षणावरही याचा परिणाम दिसून आला आहे. जिल्ह्यातील जवळपास ५० हजार विद्यार्थी यावेळी संगणक शिक्षणाचे एमएससीआयटी चे प्रमाणपत्र परीक्षा देऊ शकले नाही व शिक्षणच बंद असल्याने शिक्षण घेऊ ही शकले नाही. हे प्रमाणपत्र सरकारी नोकरी करताना राज्य शासनाने अनिवार्य केले आहे. त्यातच ज्या सरकारी कर्मचारी अजूनही एमएस-सीआयटी उत्तीर्ण होऊ शकले नाही. त्यांचीही संधी हुकली आहे. वास्तविक फिजिकल डिस्टंसिंगचे पालन करून हे शिक्षण घेणे शक्य असतानाही वर्षभरातील शिक्षणाची मात्र हानी झाल्याने युवकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
एमकेसीएल मार्फत एमएससीआयटीचे ज्ञान संगणक प्रशिक्षण केंद्रातून दिले जाते. आता तर संगणकावरील टायपिंगही सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे टायपिंग शिकण्याचे वय झालेल्या युवकांचे कोरोनामुळे टायपिंग हूकली आहे त्यांना उशिराच आता की बोर्डवर बोटांच्या हालचाली करण्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. टायपिंग हे सुद्धा सरकारी नोकरी असो वा इतर नोकर्‍यांमध्ये आवश्यक ठरत आहे. सध्या डिजिटल शिक्षणामुळे संगणकाचे शिक्षण घेणे आवश्यक आहे. सर्व व्यवहारच संगणकाच्या माऊसवर व कीबोर्ड वर सुरू झाले आहे. त्यामुळे संगणकीय ज्ञान मिळवणारे विविध अभ्यासक्रम ही पूर्णतः बंद आहेत. जे विविध अभ्यासक्रम शिकल्यानंतर अनेक युवकांना रोजी रोटीचा मार्ग गवसतो किंवा उपलब्ध तरी होतो.
एकंदरीत बेरोजगारी वाढवण्यास संगणकीय प्रशिक्षण केंद्र बंद असणे हे एक मोठे कारण ठरणार आहे. दरवर्षी किमान एमएससीआयटी चे सात सत्र होतात. मात्र २० मार्च २०२० पासून संगणकीय ज्ञान देणार्‍या केंद्रांची दारेच बंद झाली आहेत. त्याचा परिणाम भविष्यात युवकांना जाणवणार आहे. दहावी, बारावीच्या परीक्षेची चर्चा होते त्याच पद्धतीने या केंद्रांच्या परीक्षेची ही आता चर्चा होऊ लागली आहे. शैक्षणिक वर्षात दहावीची परीक्षा उत्तीर्ण झालेले विद्यार्थी घरीच बसून ऑनलाईन अभ्यास करत असताना त्यांना संगणक प्रशिक्षणाचा जोड अभ्यासक्रम घरी बसून करता आला नाही. हे शैक्षणिक क्षेत्राला लाजिरवाणी बाब ठरली आहे.
जळगाव जिल्ह्यात जवळपास १५० हून अधिक संगणक प्रशिक्षण केंद्र आहे. या केंद्रावर संगणक क्षेत्रातील विविध अभ्यासक्रम शिकवले जात असल्याने युवकांना अनेक ठिकाणी जॉब मिळतात. त्या करता दरवर्षी किमान १० बॅच तरी आमच्या होतात हे प्रशिक्षण बंद न पडणारे आहे. त्यामुळे कोणत्याही वयातील विद्यार्थी हे शिक्षण घेऊन मोकळे होतात शक्यतो दहावीनंतर हे शिक्षण घेण्यात अनेकांचा कल असतो. मात्र हे प्रशिक्षण केंद्र २० मार्च २०२० पासून कोरोनाच्या संसर्गामुळे बंद आहे
जळगाव जिल्ह्यात दरवर्षी किमान ३० हजार विद्यार्थी एमएससीआयटी ची परीक्षा देतात. या परीक्षेत जवळपास चांगला निकाल ही लागतो. सरकारी नोकरीसाठी हे शिक्षण आवश्यक असल्याने प्रशिक्षण केंद्र हाऊसफुल्ल असतात. आता हे केंद्र शहरी भागातच नाहीतर निमशहरी आणि ग्रामीण भागातही सुरू करण्यात आलेले आहे. त्यामुळे गरीब असो वा सर्वसामान्य व्यक्ती हा कोर्स आवश्यक करत आहेत. त्यातच बँक व वाणिज्य कामासाठी टॅलीचे प्रशिक्षणही कामाचे असल्याने तो सुद्धा कोर्स केला जात आहे. संगणकावर जाहिराती बनवणे, फलक, बॅनर तयार करण्यासाठी डीटीपीचा कोर्स आवश्यक असतो. त्याचेही ज्ञान मिळविण्यासाठी युवकांचा प्रतिसाद असतो हे सर्व शिक्षण बंद असल्याने मोठे नुकसान युवकांचे झाले आहे.
जळगाव जिल्ह्यात जवळपास १५० संगणक प्रशिक्षण केंद्र असून प्रत्येक केंद्रावर विविध अभ्यासक्रम शिकवले जातात त्यामुळे युवकांना अनेक ठिकाणी त्यातून जॉब सुद्धा मिळतात कोणत्याही वयातील विद्यार्थी हा संगणक प्रशिक्षण घेत असतो. शक्यतो दहावीनंतर संगणक प्रशिक्षणाकडे विद्यार्थ्यांचा जास्त कल असतो. त्यामुळे आतापर्यंत जवळपास दहा बॅच चे आमचे नुकसान झाले आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे केंद्र बंद आहे यातूनच उपासमारीची वेळ आली आहे.
– संजय सुर्यवंशी, केंद्र चालक जामनेर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here