जामनेर येथील महिलेचा खूनप्रकरणी पतीला जन्मठेपची शिक्षा

0
2

जळगाव । जामनेर येथील मारहाण करून खून केल्या प्रकरणातील पतीला जिल्हा न्यायालयाने जन्मठेपसह दंडाची शिक्षा सुनावली आहे. हा निकाल जिल्हा व सत्र यांनी दिला आहे.

जामनेर येथील शिक्षक कॉलनीत अनिल चावदस सपकाळे याने त्याची पत्नी मनीषा सपकाळे हिच्या डोक्यावर मारहाण करीत तिला 3 फेब्रुवारी रोजी गंभीर जखमी केले होते. उपचार सुरु असताना तिचा 4 फेब्रुवारी रोजी मृत्यू झाला. याप्रकरणी मनीषा सपकाळे हिची आई प्रभाबाई निना कोळी यांच्या फिर्यादीवरुन जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. न्या.एस.डी.जगमलानी यांच्या न्यायालयात कामकाज झाले. याप्रकरणी संशयित अनिल सपकाळे यास दोषी धरीत न्यायालयाने त्यास जन्मठेप व 10 हजार रुपये दंड, दंड न भरल्यास तीन महिने कारावास, अशी शिक्षा ठोठावली. सरकार पक्षातर्फे ॲड. प्रदीप महाजन यांनी युक्तीवाद केला. केसवॉच कॉन्स्टेबल सोनसिंग डोभाळ व कोर्ट पैरवी म्हणून हेडकॉन्स्टेबल राजेंद्र सैंदाणे यांनी काम बघितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here