जामनेर तालुक्यातील पहुर आणि आजूबाजू खेड्या वरती अवैध धंद्यांचे प्रमाणात वाढ

0
26

जामनेर, प्रतिनिधी । पहूर जवळ असलेल्या पिंपळगाव बुद्रुक या परिसरात चोरीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे, शेतातून मोटार पंप,केबल वायर,व पाईप, यांचे चोरीचे प्रमाण वाढत असून गावठी दारूचे प्रमाणही वाढत आहे

गेल्या काही दिवसापूर्वी पहूर पोलिस स्टेशनला पो.नि . अरुण धनवडे साहेब असताना अवैध धंदे गावठी दारू सट्टा पत्ता आणि चोरीचे प्रमाण बंद झाले होते, अरुण धनवडे साहेब यांची राजकीय पुढाऱ्यांच्या हातून त्यांची बदली झाल्याचे समजते, धनवडे साहेब पहूर येथून बदली होतास अवैध धंदे, सट्टा, पत्ता, आणि चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे, अवैध धंद्या वरती आणि गावठी दारू सट्टा पत्ता यांचे प्रमाण वाढले असून ते बंद होईल का, यांच्याकडे सर्व ग्रामस्थांचे लक्ष वेधले आहे, तरी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ जामनेर तालुका अध्यक्ष संतोष भाऊ पांढरे यांनी आणि ग्रामस्थांनी पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना परत पहुर पोलीस स्टेशनला बदली व्हावी, आणि अवैध धंदे सट्टा पत्ता आणि चोरीचे प्रमाण बंद व्हायला पाहिजे म्हणून खेड्यापाड्यातून आणि पहुर ग्रामस्थांकडून धनवडे साहेब यांची बदली पहूर पोलिस स्टेशनला करण्यात यावी असे एसपी साहेबांना दोन दिवसात निवेदन देण्यात येणार आहे,

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here