जळगाव सराफ बाजार बंद; शेतकरी विवंचनेत

0
2

जळगाव : प्रतिनिधी
गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जग कोरोनाच्य महामारीच्या संकटामुळे हैराण आहे. त्याचा परिणाम उद्योग, व्यवसाय, रोजगार यावर मोठ्या प्रमाणावर झाल्याने सर्वच स्तरातील जनतेचे दैनंदिन जीवनमान मुश्कीलीचे होवून बसले आहे. भारत हा कृषिप्रधान देश असल्यानं देशाची अर्थव्यवस्था ही शेतीवर अधीक अवलंबून आहे. शेतकरी देशाचा कणा आहे, असे आपण म्हणतो. आज हाच कणा मोडून पडला आहे. शेतकरी , मजूर मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. पावसाळा काही दिवसांवर येवून ठेपला असताना शेतीची मशागत, बी बियाणे, खते घेण्यासाठी जवळ एक दमडी देखील नाही. सध्याच्या परिस्थितीत कुणी सावकार उभा करीत नाही.
अशा परिस्थितीत शेतकर्‍या पुढं एकच पर्याय असतो तो म्हणजे मोठ्या हौशेन पत्नी, सून यांना घेतलेले सोन मोडून शेतीला लागणारे शेती उपयोगी साहित्य खरेदी करणं. अन् उघड्या डोळ्या देखत तो पैसा मातीत पेरून भविष्याच्या सुखी संसाराची स्वप्न रंगवत असतो. आज ते स्वप्न साकार करण्यासाठी तो स्वतःच सोन देखील मोडू अथवा गहाण देखील ठेवू शकत नाही. सराफ बाजार बंद असल्याने मोठ्या द्विधा मनस्थितीत शेतकरी सापडला आहे. व सराफ बाजारात चकरा मारताना दिसत आहे.या ठिकाणीं काही दुकाने शेटर खाली टाकून आत मध्ये सूरु देखील आहेत . बाहेर एक त्यांचा माणूस ग्राहकांना हेरत असतो. माञ यात ग्राहकांची वजन व भावात तफावत करुण मोठी लूट करीत असल्याचेही एका गरजू शेतकर्‍याने सांगीतले. तो म्हणाला काय करनार गरजवंताला अक्कल थोडी. असच आहे.
नावाजलेला जळगावचा कलाकुसर उद्योग धोक्यात
दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जळगांवचे सोने व कलाकुसरची देशभरात ख्याती आहे. महाराष्ट्रातील व ईतर राज्यातील सराफ बाजारात येथिल दागिन्यांना मोठी मागणी आहे. त्यामूळे येथे दगिण्यांवरील कलाकुसर उद्योग मोठा आहे. मात्र गेल्या वर्षभरापासून हा उद्योगही धोक्यात आला आहे. सराफ बाजार बंद असल्याने कलाकुसर कामगार व व्यावसायिक मोठ्या विवंचनेत सापडले आहेत.या व्यासायिकांकडे राज्यभरातील कलाकुसर दागिन्यांच्या मोठ्या ऑर्डर पेंडींग आहेत. लॉकडवून मुळे उद्योग बंद असल्याने वेळेत राज्यभरातून असलेली मागणी पूर्ण करण्यास येथिल व्यवसायिक असमर्थ ठरल्याने आज हा उद्योग बंद पडण्याच्या मार्गावर येवुन ठेपला आहे. शासनाने शेतकरी व जळगांवचे सोनेरी जगतातले वैभव टिकवून ठेवण्यासाठी सराफ बाजार व कलाकुसर उद्योग सुरू करणे अत्यंत गरजेचे आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here