जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिकची धरणे तहानलेलीच

0
3

साईमत, जळगाव ः प्रतिनिधी

यंदाच्या पावसाळ्याचे अडीच महिने उलटूनही जळगावसह नंदुरबार, अहमदनगर, धुळे, नाशिक, अहमदमनगर जिल्ह्यात अद्याप दमदार पाऊस झाला नसल्याचे चित्रं आहे. राज्यातील काही भागातच पावसाने जोरदार हजेरी लावली असल्याने धरणे भरली. मात्र आजही राज्यातील बहुतांश भाग हा कोरडाच असल्याची स्थिती आहे.
जळगाव- जिल्ह्यातील धरणातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये एकूण ५०.४०६ टीएमसी एवढा साठा आहे. आजच्या स्थितीत १९.४५ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ३२.७८ टीएमसी पाणीसाठा होता. मागील वर्षी या तारखेपर्यंत ६१७४.०० मिलीमीटर पाऊस झाला होता. आज या तारखेपर्यंत ३९१०.१० मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजच्या तारखेला सुमारे ६० टक्के कमी पाऊस झाला आहे, असे दिसून येत आहे.
धुळे जिल्ह्यातील मध्यम व लघू प्रकल्पांत केवळ २० टक्के जलसाठा शिल्लक आहे. मागील वर्षी या काळात २३ टक्के जलसाठा होता. अक्कलपाडा प्रकल्पातही गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ३.०४ टक्के जलसाठा कमी झाला आहे. हा साठा फक्त एक महिना पुरेल इतकाच आहे.. जिल्ह्यात मागील वर्षी १५९.८टक्के पाऊस झाला होता, यंदा आतापर्यंत सरासरीच्या तुलनेत ७० टक्के पाऊस झाला असून ३६१.१ पावसाची अपेक्षा आहे.

नंदुरबार- जिल्ह्याची धरणातील सर्व प्रकल्प साठा एकूण १९ टीएमसी आहे. आजच्या स्थितीत ६ टीएमसी पाणीसाठा आहे. मागील वर्षी आजच्या तारखेला ११ टीएमसी पाणीसाठा होता. मागील वर्षी या तारखेपर्यंत ११०० मिलीमीटर पाऊस झाला होता. आज या तारखेपर्यंत ५०० मिलीमीटर पाऊस झाला आहे. आजच्या तारखेला सुमारे ४५ टक्के कमी पाऊस झाला आहे. असे दिसून येत आहे. नाशिक जिल्ह्यात मागील वर्षी याच काळात ४६.०५ टीएमसी (९२.५३ टक्के) पाणीसाठा होता, जिल्ह्यात आता ३८.५ टीएमसी (७६.३५ टक्के) पाणीसाठा आहे. साधारणतः ८ महिने पुरेल एवढा हा पाणीसाठा असून मागील वर्षी आतापर्यंत ८३० मिमी पाऊस, यंदा आतापर्यंत ३८० मिमी पाऊस झाला आहे. अहमदनगर जिल्ह्यात एकूण मोठे आणि मध्यम प्रकल्प ६ असून त्याचा एकूण जलसाठा आहे. ९१०९३ टीएमसी, गेल्यावर्षी याच दिवसात ४७२९० टीएमसी जलसाठा शिल्लक होता. ज्याची टक्केवारी ५१.९१ टक्के एवढी होती तर यावर्षी एकूण ३९१०६ जलसाठा शिल्लक असून त्याची टक्केवारी ४२.९२ टक्के एवढी आहे. अहमदनगर जिल्हा गेल्यावर्षी २३२.५मी.मि पाऊस झाला होता ज्याची टक्केवारी ७४.०२ एवढी होती. यावर्षी १७९.१ मि.मी पाऊस ४० टक्के एवढी आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यासह नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर आदी तालुक्यातील धरणे तहानलेलीच असून शेतकरी संकटात सापडला आहे. पावसाळ्याचे दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस नसल्याचे चित्र आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here