जळगावात ३० हजार रुपये किंमतीची पेपर कटींग मशीन अज्ञाताने लांबिविली

0
3

जळगाव, प्रतिनिधी । ममूराबाद रोडवरील एका हॉटेलच्या मोकळ्या जागेतून 30 हजार रुपये किंमतीची पेपर कटींग मशीन चोरट्यांनी चोरून नेले. या प्रकरणी जळगाव तालुका पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

ममुराबाद रोडवरील चौगुले प्लॉट, मारुती मंदिराजवळ राहणाऱ्या प्रसाद संजय कासार (वय – 23) यांचे ममुराबाद रोडवरील हॉटेल श्री च्या बाजूला मोकळ्या जागेत सुरज बँड कंपनीचे पेपर कटींग मशीन लावले होते. 1 ते 15 डिसेंबर दरम्यान अज्ञात चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची पेपर कटींग मशीन चोरुन नेले. सोमवार, ३ जानेवारी रोजी दुपारी २ वाजता जळगाव तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोना ज्ञानेश्वर कोळी करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here