जळगावात रिध्दी जान्हवी फाऊंडेशनतर्फे राजमाता जिजाऊ जयंती गरजूंना कपडे वाटप करून साजरी

0
20

जळगाव ः प्रतिनिधी I शहरातील दाणा बाजार येथील दत्त मंदिराजवळ स्वामी विवेकानंद जयंती व राजमाता जिजाबाई यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहूणे महापौर जयश्रीताई महाजन यांनी प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

याप्रसंगी रिध्दी जान्हवी फाऊंडेशन जळगाव यांच्या संस्थापक अध्यक्षा चित्रलेखा मालपाणी यांनी दाणा बाजार येथे पेढे वाटून जयंती साजरी करण्यात आली. तसेच कार्यक्रमाचे औचित्य साधून गरीब मुलांना कपडे वाटप केले.तसेच सध्या सुरू असलेल्या कोरोना आपत्तीच्या उपाययोजनेची दक्षता घेऊन कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या नागरिकांना जयश्रीताई महाजन यांच्या हस्ते मास्क वाटप करण्यात आले. कार्यक्रमाला पद्मावती राणा, सविता दायमा, संगीता समदानी, सपना समदानी, नितेश पानसर, शेखर पाटील, विनोद चौधरी, भावेश सोनार, दत्तात्रय चौधरी, मधुकरराव बारी, बंटी बांदल, शिवाजी दळवी, बबनराव आरसुड, आदिनाथ काकडे, शेखर पाटील, विनोद कोळी, सोनू नेवे, भिकचंद झंवर, शुभम दायमा यांची प्रमुख उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here