जळगाव । अनुराग स्टेट बँक कॉलनी परिसरातील एकाची ४० हजार रुपये किंमतीची मोटारसायकल लांबविल्याची घटना ४ जानेवारी रोजी उघडकीस आहे. याबाबत रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
उमेश प्रभाकर मराठे (वय-३२) रा. कांचन नगर प्रशांत चौक जवळ हे आपल्या कुटुंबियासह वास्तव्याला आहे. मंगळवारी सायंकाळी कामानिमित्त दुचाकी (एमएच १९ बीके ८२६२) ने जळगाव शहरातील अनुराग स्टेट बँक कॉलनी येथे हनुमान मंदिराजवळ आले होते. त्यांनी दुचाकी पार्किंग करून लावली होती. त्याचे खासगी काम आटोपल्यानंतर ते दुचाकीजवळ आले असता दुचाकी आढळून आली नाही. त्यांनी दुचाकीचा परिसरात शोधाशोध केली परंतू दुचाकी कुठेही मिळून न आल्यामुळे त्यांनी रामानंदनगर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पोलीस नाईक चंद्रकांत पाटील करत आहे.