जळगावच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही

0
13

जळगाव : प्रतिनिधी
महानगरपा लिकेच्या माध्यमातून जळगाव शहरातील विकास कामांसाठी निधी कमी पडूू देणार नाही. लवकरच जळगावला भेट देणार असल्याचे सांगत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रलंबित कामांची यादी घेऊन पुढच्या आठवड्यात पुन्हा मुंबईला बोलावले असल्याची माहिती महापालिकेच्या पदाधिकार्‍यांनी दिली.
जळगाव महापालिकेत सत्तांतर झाल्यानंतर महापौर जयश्रीताई महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी काल मुंबईला जाऊन प्रथमच नगरविकास व सार्वजनिक बांंधकाममंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी नगरविकास मंंत्री शिंदे यांनी त्यांना जळगावच्या सर्वांगीण विकासाची ग्वाही दिली. तसेच आपण जळगावच्या विकासासंदर्भातील सर्व प्रलंबित विषयांची यादी घेऊन पुढील आठवड्यात पुन्हा या. सविस्तर चर्चा करून शासनस्तरावर भरीव मदत करू असे आश्‍वासन दिले. तसेच त्यांनी महापालिका आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्याशीही यासंदर्भात फोनवरून संपर्क साधला. या वेळी शिवसेनेचे रावेर तालुका संपर्कप्रमुख विलास पारकर, गजानन मालपुरे, नगरसेवक ललित कोल्हे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here