जरंडी शिवारात बिबट्याचा मृत्यू…..मृत बिबट्याचे शव शवविच्छेदनासाठी हलविले……………

0
2

 विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी

कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवर सकाळी जिवंत अवस्थेत आढळलेला बिबट्या वाघाने सायंकाळी कोल्हापुरी बंधाऱ्याच्या भिंतीवरच प्राण सोडल्याची घटना बुधवारी जरंडी (ता.सोयगाव)शिवारात उघडकीस आली आहे.सकाळी आढळलेला बिबट्या जिवंत असल्याची चर्चा मजुरांमध्ये असून मात्र या बिबट्याने औरंगाबादचे पथक पोहचण्याच्या आधीच प्राण सोडल्याची घटना उघडकीस आली आहे.या प्रकारामुळे सोयगाव परिसरात खळबळ उडाली आहे.वनविभागाच्या औरंगाबाद येथील शीघ्र कृतीदलच्या पथकाने मृत बिबट्याचे शव शवविच्छेदनासाठी हलविले आहे.मात्र अद्यापही बिबट्याच्या मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले नसल्याची माहिती वनविभागाकडून सांगण्यात आलेली आहे.
जरंडी(ता.सोयगाव)गावालगत असलेल्या कोल्हापुरी शिवारात काही शेतमजुरांना बिबट्या वाघ आढळून आला,सदरील बिबट्या वाघ हा अत्यवस्थ अवस्थेत जिवंत असल्याची माहिती वनविभागाला परिसरातील मजुरांनी दिली.घटनेची माहिती मिळताच सोयगाव वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहचल्यावरही बिबट्या जिवंत अवस्थेत विव्हळत होता.मात्र अखेरीस सायंकाळी चार वाजता या बिबट्याची प्राण ज्योत मावळली.या घटनेमुळे सोयगाव परिसरात खळबळ उडाली आहे.वनविभागाच्या पथकाकडून घटनास्थळाचा ताबा घेण्यात आला होता.औरंगाबादवरून सायंकाळी चार वाजता वनविभागाचे शीघ्र कृती दलाचे पथक दाखल होताच बिबट्याने प्राण सोडला होता.अखेरीस पथकातील वैद्यकीय तज्ञांनी बिबट्याला मृत घोषित केल्यावर शवविच्छेदनासाठी औरंगाबादला हलविण्यात आले आहे.
———-शवविच्छेदनानंतर बिबट्या वाघाच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार असून मात्र बिबट्या हा अन्न पाण्याअभावी तडफडून मृत झाल्याची ग्रामस्थांमध्ये चर्चा आहे .त्यामुळे या बिबट्याचा नैसर्गिक मृत्यू कि अन्य कारण याबाबत वनविभाग संभ्रमात पडलेला आहे.मात्र बिबट्याचा अन्न,पाण्याअभावी बिबट्याने अखेरीस कोल्हापुरी बंधाऱ्यावरील संरक्षण भिंतीवर प्राण सोडला असून हा बिबट्या पाण्यापर्यंत पोहचलाच नसल्याची चर्चा ग्रामस्थांमधून होत आहे..
वनपरिक्षेत्र अधिकारी राहुल सपकाळ,यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक सुनील हिरेकर,निलेश मुलताने,व्ही.आर नागरगोजे,एस.टी चेके,राठोड,आदींसह वनरक्षक ठाण मांडून होते.औरंगाबादवरून उपवनसंरक्षक एस.व्ही मंकावार,श्रीमती पी.पी पवार सहायक वनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली आर.आर.यु पथकातील आदी गुडे(वन्यजीव अभ्यासक) मोईनिद्दिन शेख,पशुवैद्यकीय तज्ञ डॉ,संजय गायकवाड,सूर्यवंशी आदींच्या पथकांनी तातडीने भेट दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here