चोरी केलेला कापसाचा ट्रक आरोपीसह पकडला, एलसीबी व पहुर पोलिसांची कामगिरी

0
3

जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यात कापसाने भरलेला ट्रकसह संशयित आरोपी याला ताब्यात घेतले आहे. व त्याच्याकडून मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. याप्रकरणी पहूर पोलिस स्थानकात संशयित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील शेरी येथील चार शेतकरी धर्मराज शांताराम पाटील, संजय चिंधु पाटील, ज्ञानेश्वर हरी पाटील, विनोद कडू काकडे यांनी अँग्रो फायबर प्राँडक्ट धंधुका जिल्हा अहमदाबाद(गुजरात)या जिनिंग मालकाशी प्रतिक्विंटल ८२५० रुपये भाव ठरवून दि.१२/११/२१रोजी सांयकाळी ५ वाजता चालक राजु केडिया यांच्या जीजे०५झेड२९१४या ट्रक मध्ये१५०क्विंटल कापूस पाठवला होता.दि.१४/११/२१रोजी ट्रक चालकराजु केडिया याला मोबाईल लावला असता त्याचा मोबाईल नंबर बंद आल्याने संशय आल्याने पहुर पोलिसात गुन्हा दाखल केला. तेव्हापासून पहुर पोलिस व एलसीबी जळगाव हे संयुक्त पणे तपास करत होते.
याप्रकरणी.पहूर पो, स्टे, भाग ५, गु,र,न,४५४/२०२१ भादंवि ४२० प्रमाणे गुन्हा दाखल होता. आरोपी याने परस्पर विक्री करून शेतकऱ्यांची फसवणूक केली होती. आज १७/१२/२१ रोजी LCB पथक व पहूर पोस्ट चे पोलिस उपनिरीक्षक संजय बनसोडअशांनी गुजरात येथे राजकोट शहरातून आरोपीस ट्रकसह ताब्यात घेतले व त्याचेकडून ७ लाख रुपये किमतीचा ट्रक एक लाख रोख असा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. तरी पुढील कायदेशीर कारवाई साठी पहूर पो, स्टे, चे ताब्यात देण्यात आले आहे.
आरोपी चे नाव आशिशभाई रमनिक भाई हिंगरिया रा, राजकोट ता, राजकोट गुजरात

यात पीएसआय अमोल देवढे, पीएसआय संजय बनसोड, एएसआय अशोक महाजन, हेड कॉन्स्टेबल लक्ष्मण पाटील, पोलीस नाईक किशोर राठोड, रणजित जाधव, विनोद पाटील, किशोर पाटील, मुरलीधर बारी या पथकाने ही कारवाई केली आहे. या कामगिरीबद्दल पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here