चोपडा – शिरपूर मार्गावर दुचाकींचा धडकेत शिक्षकाचा मृत्यू

0
34
ट्रकचे चाक फुटल्यामुळे रस्त्यावर उभ्या असणार्‍या ट्रकला धडक

चोपडा, प्रतिनिधी । तालुक्यातील ४८ वर्षीय बिडगाव येथील शिक्षकाचा चोपडा – शिरपूर मार्गावर झालेल्या अपघातात मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी अज्ञात दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजेंद्र रामचंद्र वाघ (48) असे मयताचे नाव आहे. शहरातील शिव कॉलनीमधील रहिवासी व बिडगाव येथील ओं.गो.पाटील माध्यमिक विद्यालयातील शिक्षक राजेंद्र रामचंद्र वाघ (48) हे पत्नीसह 5 रोजी सायंकाळी जुना हरेश्वर रस्त्याने पायी फिरायला गेले होते. संस्कार मंडपम या मंगल कार्यालयाजवळून घराकडे परत येत असताना अरुंद पुलाजवळ त्यांना चोपड्याकडे येणार्‍या एका अज्ञात दुचाकी चालकाने त्यांना मागून जबर धडक दिली. या अपघातात जबर जखमी झाल्यामुळे त्यांना तत्काळ उपचारार्थ शहरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले. परंतु प्रकृती खालावल्याने त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रविवार, 6 रोजी पहाटे 2 वाजता त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, गेल्या 26 वर्षापासून ते इंग्लिश विषयाचे अध्यापन करत होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, 4 भाऊ असा परीवार आहे. राजेंद्र वाघ यांच्या मृत्यूमुळे परीसरातून हळहळ व्यक्त करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here