ग.स.पतपेढीकडून मुख्यमंत्री सहायता निधीस अकरा लाख रुपयांचा धनादेश

0
3

जळगाव ः प्रतिनिधी
जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी पतपेढीकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी अकरा लाख अकरा हजार १११ रुपयांची धनादेशाद्वारे मदत करण्यात आली.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मंगळवारी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई, विजयसिंह गवळी, प्रशांत विरकर, भाऊसाहेब महाले, एस. आर. पाटील, एन. एस. पाटील, हेमंत नारखेडे यांनी अकरा लाख अकरा हजार १११ रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी सुपूर्द केला.
या वेळी ग. स.चे कर्मचारी लेखापाल निंबा सोनवणे, प्रशासन अधिकारी वाल्मीक पाटील, उपलेखापाल श्यामकांत सोनवणे, उपशाखाधिकारी अमोल जोशी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here