कोळगाव ता-भडगाव – (प्रतिनिधी) कर्मवीर तात्यासाहेब हरि रावजी पाटील,किसान शिक्षण संस्था,भडगाव,संचलीत गोपीचंद पुना पाटील,विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय,कोळगाव ता.भडगाव येथे जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक तथा संस्थेचे चेअरमन आदरणीय नानासाहेब प्रतापराव पाटील यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक समता परिषद,जळगावच्या वतीने शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल तात्यासाहेब ज्योतिराव फुले समता पुरस्काराने सन्मानीत करण्यात आल्याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
एस.ए.वाघ यांनी प्रास्ताविकातुन नानासाहेबांनी शिक्षण तसेच सामाजिक क्षेत्रात केलेल्या कार्याची ओळख करुन दिली तसेच त्याचे फलित म्हणजेच हा समता पुरस्कार असल्याचे महत्व विषद केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राचार्य सुनिल पाटील व पर्यवेक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक-शिक्षकेतर बंधु-भगिनींनी मोलाचे सहकार्य केले.