गुलाब चक्रीवादळात झालेल्या नुकसानीची वाढीव रक्कम मदत मिळावी – आबा पाटील

0
5

यावल, प्रतिनिधी । सप्टेंबर/आक्टोंबर2021या महिन्यात झालेल्या गुलाबचक्री वादळ अतीवृष्टीतील नुकसानीची वाढीव रक्कम मदत मिळणेसाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेस जिल्हा समन्वयक आबा पाटील (मानमोडीकर)यांच्यासह समस्त शेतकरी बांधवांनी बोदवड तहसीलदार यांना लेखी निवेदन देऊन मागणी केली.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की गेल्या सप्टेंबर/आक्टोंबर महीन्यातील गुलाबचक्री वादळ अतीवृष्टी दरम्यान बोदवड तालुकाभरात 65 मिली. च्या वर नुकसानदायक पाऊस/अतीवृष्टी झाली यात सर्व पिकांचे एकूण नुकसान सुमारे 75ते 80%च्या जास्त झाले आहे.सदरची झालेली अतीवृष्टी ही शासनाच्या ओल्या दुष्काळाच्या निकषात अत शर्तिमधे बसत आहे.आपल्या स्तरावरून पंचनामे झाले परंतु नुकसानीच्या पटीत सदर पंचनामे झालेले दिसत नसल्याने भरपाई ही फार अल्प प्रमाणात मंजूर होऊ शकते.तरी शेतकऱ्यांचा झालेला खर्च आणि शेतकरी बांधवांची मागणी लक्षात घेता,शासन स्तरावर सदर नुकसानीची वाढीव मदत रक्कम मिळावी अशी मागणी करण्यात आली असून निवेदनावर राष्ट्रवादी युवक कांग्रेस जिल्हा समन्वयक अध्यक्ष आदर्शगाव आबा पाटील यांच्यासह गोळेगाव सरपंच बापूसाहेब देशमुख, राष्ट्रवादी काँग्रेस युवक तालुकाध्यक्ष विनोद कोळी, समाधान पाटील, पळासखेडा येथिल भास्कर पारधे, जगदीश कोळी, सुरवाडा येथील ज्ञानोबा पाटील, बोदवड येथील सोपान सावकारे यांनी स्वाक्षरी केली असून निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वड्डेटीवार,राष्ट्रीय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष जयवंतराव पाटील, जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे रवाना करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here