गुटखा सुगंधी सुपारी विक्रीचे मोठे दुकानदार सोडून ३ टपरी चालकांवर कारवाई

0
8

यावल ः तालुका प्रतिनिधी
यावल शहरात गुटखा व सुगंधी सुपारी,पान मसाला विक्रीचे काही ठराविक मोठे आणि पुरवठा करणारे विक्रेते असताना किरकोळ ३ टपरी चालकांवर काल रोजी कारवाई झाल्याने तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाची चतुराई लक्षात घेता यावल शहरात व्यापारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून कारवाईबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
संपूर्ण यावल शहरात,बुरुज चौक तथा पोलीस स्टेशन जवळील भागात,सुदर्शन चित्र मंदिर परिसरात यावल बस स्टँड परिसरात,बोरावल गेट भागात गुटका सुगंधी सुपारी व पान मसाल्याचा माल पुरवठा करणारे ठराविक व्यापारी यावल शहरात आहेत परंतु या मोठ्या दुकानदारांवर कारवाई न करता या भागात गुटखा सुगंधी सुपारी व पान मसाला किरकोळ विक्री करणार्‍यांपैकी फक्त ३ टपरी चालकांवर कारवाई करण्यात आल्याने संशय व्यक्त केला जात आहे.
काल रोजी ३ टपरी चालकांवर कारवाई करताना अन्न सुरक्षा अधिकारी आर.एन.भरकळ, किशोर साळुंके,सुवर्णा महाजन, सहाय्यक समाधान बारी,चंद्रकांत सोनवणे यांचा समावेश होता.अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी कर्मचारी यावल शहरात गुटखा विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी येत असल्याचा निरोप(मेसेज)कोणीतरी एका व्यापार्‍यास अधिकारी-कर्मचारी येण्यापूर्वीच यावल शहरातील व्यापार्‍यांना आधी मिळालेला होता त्यामुळे अनेकांनी यावल शहरातील आपापली दुकाने बंद ठेवली होती. गुटखा विक्रेत्यांना येण्याची पूर्व सूचना कोणी दिली हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत असल्याने अन्न व औषध प्रशासन विभागाच्या नावावर यावल शहरातून कोणीतरी शहरातील व्यापार्‍यांकडून वार्षिक हप्ता वसूल करीत असल्याचे सुद्धा दबक्या आवाजात संपूर्ण व्यापारी वर्तुळात बोलले जात आहे.
तरी अन्न व औषध प्रशासन विभागाने निःपक्षपणे सर्वस्तरीय होलसेल गुटखा विक्रेत्यांवर तसेच इतर काही जीवनावश्यक वस्तू व खाद्यपदार्थ शितपेय वस्तू विक्रेत्यांवर कारवाई करून ग्राहकांचे व नागरिकांचे आरोग्यहित जोपासावे अशी रास्त अपेक्षा यावल शहरातून व्यक्त करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here