गाडी लावण्याच्या कारणावरून एकावर प्राणघातक हल्ला नगरसेवकासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

0
2
बडतर्फ सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकाने गावठी कट्टय़ातून केला गोळीबार

पहुर, प्रतिनिधी । तालुक्यातील शेंदुर्णी येथे गाडी लावण्याच्या कारणावरून एकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. याप्रकरणी नगरसेवकासह पाच जणांविरुद्ध पहूर पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी येथे वाडी दरवाजा जवळ गाडी लावण्याच्या वादातून एकावर प्राणघातक हल्ला झाला, समाधान पाटील यांनी जवळचे शेंदुर्णी कुरुक्षेत्र कार्यालयात तक्रार दाखल करण्यासाठी गेला असता तेथून परत येत असताना हनुमान मंदिराजवळ रात्री दहा वाजेच्या सुमारास सागर सुभाष ढगे, गोविंदा अर्जुन बारी, विकी सुभाष ढगे, शरद बाबुराव आस्वार, शिवम गजानन गुजर, सर्व राहणार वाडी दरवाजा, यांनी लोखंडी रॉड, दांड्यासह इतर साहित्याने प्राणघातक हल्ला अडवित भारत गंभीर जखमी करून उजव्या पायावर मार बसून पायाचे हाड मोडले तर डोक्यावर झालेल्या वारा मध्ये कान कापला तर मार चुकवण्यासाठी हात पुढे केला असता हाताची बोटे मोडली होती, समाधान हा गंभीर अवस्थेत असून यांनी हिसका देऊन सुटका करून घेतली होती, त्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार जळगाव येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे, समाधान याने दिलेल्या फिर्यादीनुसार पहूर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्यानुसार पुढील तपास सुरू असताना तपास अधिकारी ए एसआय शशिकांत पाटील यांनी फिर्यादीचा प्रत्यक्ष जबाब घेत चौकशी करून अहवाल वरिष्ठांकडे सादर केला असता यामध्ये जीवे ठार मारण्याचा प्रयत्न कलम ३०७, वाढवण्यात आली आहे, तपास पीएसआय दीपक मोहिते करीत आहेत. तसेच २ संशयितांना अटक करण्यात आली आहे, ३ अजूनही फरार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here