जळगाव, प्रतिनिधी । महाराष्ट्र जनक्रांती मोर्चा तर्फे जळगाव येथील काव्यरत्नवली चौकात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादन सभा घेण्यात आली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला विर सावरकर रिक्षा युनियनचे अध्यक्ष दिलीपभाऊ सपकाळे यांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात आले . अभिवादन सभेत महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष मुकुंदभाऊ सपकाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जिवनसंघर्षावर काही प्रासंगिक उदाहरण देऊन प्रकाश टाकला . तद्नंतर छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे व महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेश सचिव हरिश्चंद्र सोनवणे यांनीही मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले . कार्यक्रमाचे प्रास्ताविक रमेश सोनवणे यांनी , सूत्रसंचालन बापूराव पानपाटिल तर आभार प्रदर्शन कानळद्याचे ग्रामपंचायत सदस्य जगदीश सपकाळे यांनी केले.
याप्रसंगी वाल्मिक सपकाळे , फारूक कादरी , बाबुराव वाघ , महेंद्र केदारे , सुरेश तायडे , साहेबराव वानखेडे , सचिन बिऱ्हाडे , पिंटू सपकाळे , विनोद सुर्यवंशी , नामदेव सोनवणे सर , पितांबर अहिरे , दिलीप त्रंबक सपकाळे , युवराज सुरवाडे , गौतम सपकाळे , यशवंत घोडेस्वार , राहुल सपकाळे , आकाश सपकाळे , धनंजय बिऱ्हाडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते . कार्यक्रमात ” जय ज्योती जय क्रांती , क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा विजय असो ” अशा घोषणा देत अभिवादन करण्यात आले .