कोरोना रुग्णांना हॉटेल उद्योजकांनी भोजन देऊन जपली बाधिंलकी

0
4

मलकापूर ः प्रतिनिधी
येथील उपजिल्हा रुग्णालयात कोरोना बाधीत रुग्णांना व त्यांच्या नतेवाईकांना हॉटेल उद्योजकांनी भोजन देऊन सामाजिक बाधिंलकी जपली. दरम्यान ,या भोजनाचे वाटप नगराध्यक्ष अँड . हरीश रावळ यांचेहस्ते करण्यात आले.
येथील उपजिल्हा रुग्णालयात सुरु करण्यात आलेल्या कोविड सेंटरमध्ये उपचारार्थ असलेल्या कोरोना बाधीत रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवावी याकरिता त्यांना मासांहारी जेवण देण्याची इच्छा तळणी -माकोडी फाट्यावरील हॉटेल उद्योजक स्वप्नील नारखेडे, मंगेश नारखेडे, यांनी नगराध्यक्ष अँड . हरीश रावळ यांचेकडे व्यक्त केली, त्या अनुषंगाने अँड. हरीश रावळ यांनी सेंटर मध्ये असलेल्या रुग्णांना मासांहारी जेवण व इतरांना शाकाहारी जेवण तसेच त्यांच्यासमवेत असलेल्या नातेवाईकांना सुद्धा जेवण देणेबाबत संबंधितांना सांगितले.
नगराध्यक्ष अँड. हरीश रावळ यांच्या प्रमुख उपस्थितीत रुग्णांना मासांहारी व शाकाहारी जेवणाचे वितरण करण्यात आले.
यावेळी भाराकॉं शहराध्यक्ष राजू पाटील, पाणीपुरवठा सभापती अली गांधी, हरीभाऊ गोसावी, अजय टप, दिपक मुंजाळ, ईश्‍वर भदाले , मंगेश पाटील मुन्ना व्यास, महादेवराव लटके आदी उपस्थित होते . यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांनी स्वप्नील नारखेडे, मंगेश नारखेडे, यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here