कोरोनामुळे रक्तटंचाई; भाजपच्या ५३ कार्यकर्त्यांनी केले रक्तदान

0
9

जळगाव ः प्रतिनिधी
कोरोनामुळे रक्त टंचाई निर्माण झाली आहे. त्यापार्श्‍वभूमीवर भाजपतर्फे मंगळवारी हनुमान जयंतीनिमित्ताने रक्तदान शिबिर घेण्यात आले. यात ५३ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
भाजप जिल्हा महानगरतर्फे सकाळी ९ ते ११ दरम्यान मंडल क्रमांक ४ व ९ येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले. सकाळी ९ वाजता मंडल ४ नंदनवन कॉलनी येथे सृष्टी हॉस्पिटलमध्ये आमदार राजूमामा भोळे, महानगर अध्यक्ष दीपक सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस विशाल त्रिपाठी, डॉ. राधेश्याम चौधरी यांच्या हस्ते श्री हनुमान प्रतिमेचे पूजन करून शिबिराला सुरुवात करण्यात आली. शिबिराचे नियोजन मंडल अध्यक्ष केदार देशपांडे, नीलेश कुलकर्णी यांनी केले.
नगरसेविका दीपमाला काळे, धीरज वर्मा, ललित लोकचंदाणी यांनी रक्तदान करून सुरुवात केली.या प्रसंगी प्रदेश महिला आघाडी उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, विशाल पाटील, पिंटूभाऊ काळे, मनोज भांडारकर, चेतन तिवारी,महिला आघाडी अध्यक्ष दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, रिक्षा आघाडी अध्यक्ष प्रतिक शेठ, जयंत चव्हाण, सागर पोळ उपस्थित होते.
मंडल क्रमांक ९ महाबळ स्टॉप, जाणता राजा चौक येथे रक्तदान शिबिर सकाळी ९ ते ११ च्या दरम्यान घेण्यात आले. जिल्हा पदाधिकारी नितीन इंगळे, राहुल वाघ, युवा मोर्चा अध्यक्ष आनंद सपकाळे, सचिन बाविस्कर, जयंत चव्हाण, गौरव पाटील, अबोली पाटील, प्रसाद पाटील, आकाश पाटील, अमित सोळंकी, सुरसिंग पाटील, रविंद्र कोळी, संजय तिरमले,
अनंत देसाई, प्रवीण मोहोर, पंकज सावळे, चेतन अदंगले, संतोष डांबरे, भुपेश कुलकर्णी, प्रथम पाटील, अशोक महाजन, रोहित सोनवणे, रुपेश मौर्य उपस्थित होते. या शिबिरास गोळवलकर रक्तपेढी, अविकुमार जोशी यांचे सहकार्य लाभले.
दात्यांचे आमदारांकडून कौतुक
दरम्यान, रक्त टंचाई दूर करण्यासाठी रक्तदान शिबिर घेण्याचे आवाहन आ. राजूमामा भोळे यांनी करुन शिबिरात रक्तदान करणार्‍यांचे कौतुकही केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here