कोकण कन्या ब्रँडच्या कलाकारांनी जिंकली रसिकांची मने

0
2

जळगाव : प्रतिनिधी I मुंबईच्या स्निती मिश्रा यांनी शास्त्रीय गायन, शास्त्रीय संगीतासह भारतीय अभिजात संगीत सादर केले. कोकण कन्या ब्रँडने सुफी, गझल, जुनी हिंदी चित्रपट गीते सादर करून रसिकांची मने जिंकली. निमित्त होते छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात आयोजित केलेल्या बालगंधर्व संगीत महोत्सवाचे.

प्रथम सत्रात रविवारी स्निती मिश्रा यांनी ‘हर हर हर महादेव महेश्‍वरा..` मालकंस रागातील या गीताने कार्यक्रमाची सुरुवात केली. त्यानंतर छोटा ख्याल ‘कोयलिया बोले..` ही रचना सादर केली. गायिका स्वर्गीय किशोरी अमोणकर यांचा मराठी अभंग ‘हे श्‍याम सुंदर राज असा मनमोहना..` हे रूपक तालात सादर केले. त्रितालमध्ये पं. वसंतराव देशपांडे यांनी गाऊन अजरामर केलेले ‘घेई छंद मकरंद..` हे नाट्यगीत सादर केले. स्निती मिश्रा यांनी त्यांचे दादा गुरू पंडित बलवंतराव भट यांचे ‘होली होली खेलत नंदलाल` राग सादर केला. अडाणा रागामधील तराणा ‘कान्हा दे रे` सादर करून पहिल्या सत्राची सांगता करण्यात आली. स्निती मिश्रा यांना यशवंत वैषण यांनी तबल्यावर तर मिलिंद कुलकर्णी यांनी संवादिनीवर साथ दिली.

पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जळगाव जनता बँकेचे सीईओ पुंडलिक पाटील, संचालक कृष्णा कामटे, पश्‍चिम क्षेत्र केंद्र सांस्कृतिक केंद्र उदयपूरचे शशांक दंडे, जैन इरिगेशनचे विजय मोहरीर, अनिल जोशी, विश्‍वप्रसाद भट, इंडियन ऑइलचे किरण शिंदे, केशव स्मृतीचे भरत अमळकर, भारतीय जीवन विमा कंपनीचे चंद्रशेखर आगरकर, डॉ. अर्पणा भट, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातील मयूर पाटील यांनी गणेश वंदना सादर केली. दीप्ती भागवत यांनी निवेदन केले. वरुण देशपांडे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान सदस्यांनी परीश्रम घेतले.

संगीत महोत्सव 2023ची घोषणा : स्वर्गीय वसंतराव स्मृती प्रतिष्ठानतर्फे होणाऱ्या सांगीतिक बालगंधर्व महोत्सव पुढील वर्षी 6, 7 व 8 जानेवारी 2023 होणार असल्याची घोषणा समारोपात करण्यात आली. ही घोषणा प्रतिष्ठानचे कार्यकारी विश्‍वस्त दीपक चांदोरकर यांनी केली.

जोशी, विश्‍वप्रसाद भट, इंडियन ऑइलचे किरण शिंदे, केशव स्मृतीचे भरत अमळकर, भारतीय जीवन विमा कंपनीचे चंद्रशेखर आगरकर, डॉ. अर्पणा भट, दीपक चांदोरकर, दीपिका चांदोरकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातील मयूर पाटील यांनी गणेश वंदना सादर केली. दीप्ती भागवत यांनी निवेदन केले. वरुण देशपांडे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी प्रतिष्ठान सदस्यांनी परीश्रम घेतले.

रांगोळी स्पर्धेतील यशस्वी कलाकारांना या कार्यक्रमात बक्षीस वितरण करण्यात आले. त्यात माधुरी बारी प्रथम, लेखश्री जगदाडे द्वितीय, तर रत्नप्रभा येवले तृतीय आल्या. रांगोळी स्पर्धेचे परीक्षण रुण भाटे, गीता राऊळतोळे, समीर दीक्षित आदींनी केले होते.

बालगंधर्व महोत्सवाचे आकर्षण असलेल्या मुंबईतील ‘कोकण कन्या ब्रँड`ने या महोत्सवाची सांगता झाली. पंचतुंड या वेगळ्या ढंगातील पारंपरिक नांदीने सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ‘हा झेंडा कुणा गावाचा`, ‘आज जाने की जिद ना करो,` ‘लग जा गले` या हिंदी सिनेगीतांसह अभंग रंगले. ‘जीव रंगला जीव दंगला` या सिनेगीतासह भावगीत मेलडीने रसिकांवर अधिराज्य गाजवले. नाट्यगीत व दादा कोंडके-लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या गाण्याची मेलडी रसिकांना भावली. वीर सावरकरांचे ‘ने मजसी ने.. परत मातृभूमीला` या गीताने राष्ट्रभक्तीचे स्फूरण चढले. संगीतकार रविराज कोलथरकर, आरती सत्यपाल, अरुंधती तेंडुलकर, रसिका बोरकर, निकिता घाटे, साक्षी मराठे व विशाल सुतार यांनी उत्तरोत्तर कार्यक्रमात रंगत आणली. स्नेहा आयरे यांचे रसाळ निवेदन भावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here