फैजपूर ता यावल : प्रतिनिधी
येथील आठवडे बाजार परिसरात मौलाना अब्दुल कलाम आझाद शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या समोर फैजपूर नगरपालिकेतर्फे करण्यात येत असलेल्या बांधकामात ठेकेदाराने आपला मनमानी सुरू करून बांधकामात चांगल्या वाळूचा वापर न करता घेसूचा वापर करण्यात येत असल्याने सामान्य नागरिकां मधून संताप व्यक्त केला जात आहे.
फैजपूर नगरपालिकेने सुमारे एक कोटी रुपयांच्या कॉंक्रीटीकरण आदी बांधकामाची निविदा प्रसिद्ध केली होती. त्या निविदेच्या अनुषंगाने करण्यात येत असलेल्या बांधकामात नियम धाब्यावर ठेऊन ठेकेदाराने गिरणा किंवा उत्कृष्ट प्रतीच्या वाळूचा वापर न करता परिसरातील नद्या नाल्यातील माती मिश्रित वाळूचा सर्रास वापर करून कॉंक्रीटीकरण केले जात आहे.
या बांधकामा ठिकाणी नगरपालिकेच्या अनेक नगरसेवकांनी भेट देऊन पाहणी केली मात्र त्यांच्या डोळ्यासमोर बोगस बांधकाम होत असूनही त्यांच्या सूचनांची ठेकेदाराने दखल घेतली नाही.
गरपालिका बांधकाम इंजिनिअर फारुकी साहेब यांनीही वारंवार सूचना करूनही ठेकेदाराचा मनमानीपणा सुरू आहे. याबाबत अनेकांनी नाराजी व्यक्त करून होत असलेले नित्कृष्ट प्रतीचे बांधकाम थांबविण्यात येऊन चौकशी करावी. तोपर्यंत संबंधित ठेकेदाराला या कामाचे बिल अदा करण्यात येऊ नये अशी मागणी होत आहे.



