कै. अनिलदादा देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त रक्तदान शिबिर

0
2

चाळीसगाव, प्रतिनिधी I तालुक्याला उंचीवर नेऊन ठेवणारे व्यक्तिमत्व, ज्यांच्या नावाचा अजूनही गावागावात उल्लेख केला जातो, असे दिवंगत लोकनेते स्व.अनिल दादा देशमुख यांच्या स्मृतीदिनानिमित्त चाळीसगाव येथे सुमेध भोसले व मित्र परिवाराच्या वतीने रक्तदान शिबिर घेण्यात आले.

कोरोनामुळे खूप मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुडवडा आहे. थॅलेसेमिया सारख्या आजारात नियमित नव्या रक्ताची गरज भासत असते. तसेच शासनाच्या वतीने नियमित रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात आलेले होते. याचीच जाण ठेवत रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. चाळीसगाव तालुक्यातील सुसंस्कृत व्यक्तिमत्व म्हणून दिवंगत अनिलदादा देशामुख यांची ओळख आहे. त्यांच्या घराबद्दल प्रचंड आदर आहे. दिवंगत अनिलदादा देशमुख यांच्या स्मृती समाजोपयोगी काम करून जागृत कराव्या, अशी भावना रक्तदान शिबिराच्या आयोजनाच्या माध्यमातून सुमित भोसले यांनी मांडली. रक्तदान शिबिरातून असंख्य गरजू लोकांना त्याचा उपयोग होईल. अनिल दादांनी सुद्धा गरजू लोकांना आपला हात दिला, असे भावोद्गार माजी आ. राजीव देशमुख यांनी याप्रसंगी काढले. जीवन सुरभी ब्लड बँकेच्या वतीने हे रक्तदान शिबिर घेण्यात आले. या रक्तदान शिबिराला 104 रक्तदात्यांनी आपले रक्तदान केले. रक्तदान शिबिराला युवकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. जीवन सुरभी ब्लड बँकेत इतक्या मोठ्या प्रमाणावर एकाच दिवसात रक्तदान कधीच झाले नाही. हा एक प्रकारचा सुमेध भोसले व मित्र परिवाराचा रेकॉर्ड आहे असे जीवन सुरभी ब्लड बँकेचे डॉ.भदाणे यांनी सांगितले.

रक्तदान शिबिराला माजी आ.राजीव देशमुख, प्रदीप देशमुख, अतुल देशमुख, सिद्धू देशमुख, दिनेश पाटील, प्रमोद पाटील, डी.वाय.चौव्हान, शाम देशमुख, पं.स.सभापती अजय पाटील, जि.प.सदस्य भूषण पाटील, दीपक पाटील, शेखर देशमुख, महेंद्र पाटील शिवसेना, अलाउद्दीन शेख, भगवान राजपूत, प्रदीप राजपूत, बंटी ठाकूर, भूषण ब्राह्मणकार, टोनू राजपूत, अरुण पाटील, स्वप्नील कोतकर, अनिल सोनार, सागर देशमुख उपस्थित होते. शिबिर यशस्वितेसाठी सुमेध भोसले व मित्र परिवाराने परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here