यावल प्रतिनिधी । ४७ वर्षीय शेजमजूराची घरामध्ये दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना १४ रोजी किनगाव येथे घडली. याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
यावल तालुक्यातील किनगाव येथील शेतमजूर राजु रामसिंग कोळी (वय-४७) हे मोलमजूरी करून आपल्या कुटुंबियाचा उदरनिर्वाह करतात. आज गुरूवारी १४ ऑक्टोबर रोजी राजू कोळी यांची पत्नी शेतात कामाला गेल्या होत्या. घरात कुणीही नसल्याने घर बंद करून छताला दोरीच्या सहाय्याने गळफास घेवून आत्महत्या केल्याचे उघडकीला आले.
आत्महत्या करण्याचे कारण समजू शकले नाही. मयताचा मोठा भाऊ अशोक कोळी यांच्या खबरीवरून यावल पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान मागील तीन दिवसात किनगाव गावातील एकाच गल्लीतील ही तिसरी घटना आहे.