करोनाने क्रिकेटला पुन्हा दिला मोठा झटका, दुसऱ्या वर्षी आशिया कप रद्द करण्याची वेळ

0
16

आशिया कप क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेतला गेलाय. करोनामुळे ही स्पर्धा पुन्हा एकदा रद्द करण्यात आली आहे. गेल्या वर्षी देखील ही स्पर्धा रद्द करण्यात आली होती.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाने बुधवारी यासंदर्भातील माहिती दिली. आशिया कप २०२१ रद्द करण्यात आला आहे. करोना व्हायरसमुळे हा निर्णय घेतला गेलाय. या स्पर्धेत भाग घेणारे देश सध्या करोना विरुद्ध लढत आहेत. त्यामुळे अशा अवस्थेत स्पर्धेचे आयोजन करणे धोकादायक ठरू शकते.

या वर्षी आशिया कप श्रीलंकेत होणार होता. पण लंकेत करोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे लंकेच्या बोर्डाने हा निर्णय घेतला. आशिया कप स्पर्धत भारत आणि पाकिस्तान यांच्यात देखील मॅच होणार होती. पण पुन्हा एकदा चाहत्यांना या दोन्ही देशातील लढत पाहण्यासाठी वाट पाहावी लागणार आहे.

श्रीलंका क्रिकेट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एश्ले डी सिल्वा म्हणाले, सध्याची परिस्थिती पाहता आशिया कप या वर्षी जूनमध्ये होणे शक्य नाही. येणाऱ्या काळात आंतरराष्ट्रीय कार्यक्रम देखील व्यस्त आहे. अशात आशिया संघातील होणाऱ्या या लढती पाहण्यासाठी चाहत्यांना २०२३ वर्ल्डकपनंतर वाट पाहावी लागणार आहे.

श्रीलंकेतील सरकारने बुधवारी १० दिवसांसाठी सर्व आंतरराष्ट्रीय विमान प्रवासावर बंदी घातली आहे. श्रीलंकेचा राष्ट्रीय संघ ३ सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी सध्या बांगलादेशमध्ये आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here